Ad will apear here
Next
‘तंबाखूविरोधात विविध स्तरांवर प्रयत्न आवश्यक ’
डॉ. अशोक भणगे यांचे प्रतिपादन
पुणे : ‘३१ मे हा दर वर्षी ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ही ‘टोबॅको अँड लंग हेल्थ’ असून, तंबाखूचा फुप्फुसाच्या आरोग्यावर होणारा घातक परिणाम अधोरेखित करते. फुप्फुसाला होणाऱ्या कर्करोगांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांचा सर्वांत मोठा वाटा आहे. त्यामुळेच तंबाखूविरोधात विविध स्तरांवर प्रयत्न करून वेळीच आळा घालणे महत्त्वाचे आहे,’ असे मत रूबी हॉल क्लिनिकच्या कमलनयन बजाज सेंटरचे अध्यक्ष डॉ. अशोक भणगे यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ‘धुम्रपान व तंबाखूचे सेवन हे फक्त फुप्फुसावर परिणाम करीत नाहीत, तर मुखाचा, जिभेचा अन्ननलिका व श्वामसनलिकांचा कर्करोग यांसह इतर अवयवांनाही धोका पोहचवितात. भारतात ९० टक्क्यांहून अधिक फुप्फुसाचे कर्करोग हे तंबाखू सेवनाने होतात. तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांमध्ये वंध्यत्वाचा धोकाही निर्माण होऊ शकतो; तसेच मधुमेह, हदयरोग, पॅरालिसिस याचादेखील धोका बळावू शकतो. याशिवाय शरीरावर बाहेरून दिसणाऱ्या  परिणामांमध्ये (कॉस्मॅटिक इफेक्टस) मध्ये ओठ काळे पडणे, तोंडामध्ये पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, दात खराब दिसणे, त्वचेवर परिणाम होणे, तोंडातून दुर्गंधी येणे यांचा समावेश आहे.’

रूबी हॉल क्लिनिकच्या आँकोलॉजी विभागाचे संचालक डॉ. मिनिष जैन म्हणाले, ‘तरूणांना तंबाखूच्या विळख्यातून वेळीच बाहेर काढणे गरजेचे आहे. यासाठी विविध वयोगटांत जनजागृती, वैद्यकीय क्षेत्रातील  लोकांचा विविध उपक्रमांमध्ये सहभाग, तंबाखूवरचा कर वाढविणे यांसारखे अनेक प्रयत्न एकत्रितरित्या करणे गरजेचे आहे.’  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZLOCA
Similar Posts
पुण्यातील डॉ. सुमित शाह यांना राष्ट्रीय पुरस्कार पुणे : पुण्यातील प्रोलाईफ कॅन्सर सेंटरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुमित शाह यांना ‘प्रॉमिसिंग सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट ऑफ द इयर-२०१९’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सातव्या ‘ग्लोबल हेल्थकेअर एक्सलन्स अॅवॉर्डस् अँड समिट’ या कार्यक्रमात आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे व पद्मश्री डॉ
तिच्या जिद्दीपुढे मृत्यूही हरला पुणे : सध्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे लढा देत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले जात आहे. तशीच जिद्द दाखवून सोलापूरच्या पन्नास वर्षीय महिलेने ‘ग्लिओब्लास्टोमा’ या दुर्मीळ प्रकारच्या कर्करोगाला हरवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये पाच वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत
२५० महिलांनी घेतला कर्करोग तपासणी शिबिराचा लाभ कोपरगाव : स्तनाचा कर्करोग जागरूकता महिन्यानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्करोग तपासणी आणि जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५० महिला, मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे कॅन्सर मॅनेजमेंट कोर्स पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे प्राथमिक देखभाल चिकित्सकांसाठी (प्रायमरी केअर फिजियन्स) १३व्या कॅन्सर मॅनेजमेंट शॉर्ट सर्टिफिकेट कोर्सचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language