Ad will apear here
Next
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात रक्तदान शिबीर
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी विद्यार्थी व  प्राध्यापकवर्ग
पुणे : शिकागोमधील धर्म संसदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या १२५ व्या वर्धापनदिनानिमित्त टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचा संगणक शास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकतेच महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ३५ विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सलग २२ व्या वर्षी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. आशुतोष काळे व संतोष नखाते यांनी रक्तदान आणि चांगल्या आरोग्याच्या सवयींविषयी विद्यार्थांना मार्गदर्शन  केले. 

रक्तदान शिबिराप्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र लेले, शिरीष नाईकरे, प्रा. सत्याप्पा कोळी आदी
प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी,  संस्थेचे सहचिटणीस शिरीष नाईकरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुचेता दळवी, प्रा. रुपाली अवचरे, प्रा. सत्याप्पा कोळी, डॉ. शीतल रणधीर, प्रा. अनघा देशमुख, प्रा. योगिता झोपे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र लेले व अन्य प्राध्यापक या वेळी उपस्थित होते. डॉ. अर्जुन मुसमाडे, प्रा. दत्तहरि  मुपाडे,  आनंद नाईक यांनी शिबीर व्यवस्था चोख ठेवण्यासाठी मदत केली. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विलास पंगुडवाले,  चिटणीस आनंद छाजेड  यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZQLBS
Similar Posts
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर कुसगाव : श्रीमती काशीबाई नवले सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले यांच्या हस्ते झाले.
‘वृक्षसंवर्धन काळाची गरज’ पुणे : ‘वृक्षांमुळे मानवी जीवन आरोग्यदायी बनते. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार देणारा विभाग आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केले.
‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’.... स्वामी विवेकानंदांची शिकागो सर्वधर्मपरिषदेतील भाषणे ‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’ या संबोधनाने स्वामी विवेकानंदांनी भारताला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली होती. शिकागो येथे १८९३मध्ये झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत ११ सप्टेंबर रोजी विवेकानंदांचे ते ऐतिहासिक भाषण झाले होते. त्या भाषणाला १२७ वर्षे होऊन गेली आहेत. त्याच परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सहा भाषणे केली
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘एनएसएस’चे विद्यार्थी रवाना पुणे : पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामात मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी पुढे सरसावले असून, गुरुवारी (२२ ऑगस्ट) ५०० विद्यार्थ्यांचे पथक या भागात रवाना झाले. या पथकाच्या गाड्यांना विभागीय आयुक्त डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language