
ऑगस्ट १९४७ हा काळ भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. एक ते १५ ऑगस्ट या स्थित्यंतराच्या काळातील आणि भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या १५ दिवसांची गाथा प्रशांत पोळ यांनी ‘ते पंधरा दिवस’मधून कथन केली आहे.
याची सुरुवात होते ती एक ऑगस्ट १९४७ रोजी महात्मा गांधी यांचा काश्मीर दौरा आणि गिलगीटच्या हस्तांतराच्या घटनांनी. त्यानंतर दोन ऑगस्टला ब्रिटिशांकडून होणाऱ्या हस्तांतराची सुरू झालेली धावपळ, पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे काम, पुणे, श्रीनगर, तत्कालीन मद्रास या भागातील घडामोडी, तीन ऑगस्ट रोजी गांधीजींच्या काश्मीर दौऱ्याचे फलित, बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्री म्हणून नियुक्त केल्याचे नेहरूंचे पत्र, चार ऑगस्ट रोजी व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांच्या बैठकी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गुरुजी यांचा सिंध दौरा, अशा दररोजच्या घटनांचे चित्रण यात आहे. १५ ऑगस्टला भारतात स्वातंत्र्याची पाहत उगवली. त्या दिवसाचे वर्णन, विविध ठिकाणची परिस्थिती, नेत्यांची अवस्था याचा मागोवा घेतला आहे.
पुस्तक : ते पंधरा दिवस
लेखक : प्रशांत पोळ
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पाने : १५९
किंमत : १९० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)