Ad will apear here
Next
राज्यातील पहिला महिला संचालित दुग्ध व्यवसाय मावळमध्ये सुरू
टाटा पॉवरच्या सहकार्याने मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर लिमिटेडची स्थापना

मावळ : संपूर्णपणे महिलांनी चालविलेला महाराष्ट्रातील पहिला दुग्ध व्यवसाय पुणे जिह्यातील मावळ तालुक्यात सुरू झाला आहे. टाटा पॉवरच्या सहकार्याने येथील महिलांनी मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून, याद्वारे सर्वसामान्य शेतकरी ते कृषी उद्योजिका असा मोठा टप्पा या महिलांनी पार केला आहे.  

मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन करताना खासदार श्रीरंग बारणे, टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा व अन्य मान्यवर

नुकतेच या कंपनीचे उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके आणि टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांच्या हस्ते झाले. 

‘महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने टाटा पॉवरने २०१५ मध्ये येथे स्थापन झालेल्या डेअरी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले असून, त्याची संपूर्ण सूत्रे महिलांच्या हाती देण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी ३३४ सदस्य असलेल्या या डेअरीची सदस्यसंख्या आता १२०० वर जाऊन पोहोचली आहे. या प्रकल्पाने १५ आधुनिक सुसज्जित दूध संकलन केंद्रे विकसित केली असून, त्यामध्ये २६ गावांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पात विविध गावांमधून जवळपास सहा हजार लिटर दूध दर दिवशी जमा केले जाते. आता या कंपनीतर्फे पुणे, मुंबई येथे दुधपुरवठा करणे तसेच पनीर, क्रीम इत्यादी दुग्धजन्य उत्पादनांचे वितरण वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘क्रेयो’ या नावाने ही उत्पादने ऑनलाइन उपलब्ध करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती प्रवीर सिन्हा यांनी दिली.


ते पुढे म्हणाले, ‘स्थानिकांना स्वयंपूर्ण होण्यात मदत करण्यासाठी टाटा पॉवरतर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांमधून हा मावळ डेअरी प्रकल्प उभा राहिला आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय स्थानिक महिलांना जाते. त्यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सहकाराचा मार्ग निवडला आणि आज त्या स्वतः स्वयंपूर्णतेचे आदर्श उदाहरण बनल्या आहेत. मावळचे शेतकरी आणि टाटा पॉवरची शाश्वत उद्धिष्टांप्रतीची वचनबद्धता यांच्यातीला दुवा बनल्याबद्दल मी आमचे सहयोगी एएलसी इंडिया यांचे आभार मानतो.’


टाटा पॉवरचे हायड्रोज विभागाचे प्रमुख अश्विन पाटील म्हणाले, ‘आजवर भारतात दुग्ध उद्योगात पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. आता यामध्ये प्रगतिशील परिवर्तन घडून येत आहे. या व्यवसायात महिलांची भूमिका गुरांची काळजी घेणे, त्यांना चारा, पाणी देणे, दूध काढणे इतपतच मर्यादित होती; पण आता त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारत असल्यामुळे दुग्ध सहकाराची चळवळ अधिक मजबूत झाली आहे.’        

ते पुढे म्हणाले, ‘ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना प्रकल्पाच्या संपूर्ण संचालन व व्यवस्थापनाचा मंच उपलब्ध करवून देण्यासाठी आम्ही हा प्रकल्प सुरु केला आहे. महिला दुग्ध शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरने दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच शुद्ध दूध उत्पादन आणि पशु व्यवस्थापन याची ओळख करून देणारे प्रशिक्षण आयोजित केले. दूध संकलनात वाढ व्हावी आणि डेअरीमध्ये नवनवीन सदस्य सामील व्हावेत यासाठी टाटा पॉवरतर्फे आजूबाजूच्या भागांमध्ये सर्वेक्षण करून मावळ भागातील लोकांच्या नेमक्या गरजा समजून घेतल्या जात आहेत. प्रकल्प सुरळीतपणे चालावा, यासाठी १५ नवीन गावांना यामध्ये समाविष्ट करवून घेण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात ३००० शेतकरी कुटुंबांचा समावेश असलेल्या पशुपालन व्यवसायातील स्थानिकांना इतर पूरक सेवादेखील पुरविण्यात आल्या आहेत.’   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZNJCH
Similar Posts
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर
होंडातर्फे पहिली ‘बीएस-सिक्स’ मोटारसायकल दाखल नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने वायू उत्सर्जनाबाबतच्या भारत-सहा (बीएस-सिक्स)निकषांची पूर्तता करणारी पहिली अत्याधुनिक १२५ सीसी क्षमतेची मोटरसायकल ‘एसपी१२५ बीएस-सिक्स’ दाखल केली आहे.
भारतात गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक पुणे : ‘भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही देशांच्या प्रगतीला पूरक आहेत. व्यवसाय, शिक्षण, आयटी, संशोधन, आरोग्य, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक आहोत. महाराष्ट्रात जपानी कंपन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी
नवीन वर्षात रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल : डॉ. निरंजन हिरानंदानी मुंबई : ‘२०२०च्या सुरुवातीस, भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात आर्थिक शिस्त, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या रचनात्मक आर्थिक धोरणातील सुधारणांचे परिणाम दिसून येतील. मागणी-पुरवठा असमतोल, गुंतवणूक आणि कमी झालेली मागणी या अडचणी दूर होऊन खरेदीला गती मिळेल,’ असा विश्वास ‘नरेडको’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language