Ad will apear here
Next
आयुष्यात मिळालेली दुसरी संधी अत्यंत महत्त्वाची : राहुल देशपांडे


‘स्टार प्रवाह’वर १२ जानेवारीपासून दर शनिवार-रविवारी दुपारी १२ वाजता ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम सुरू होत आहे. राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी, आदर्श शिंदे हे कलाकार या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत असून, अभिनेते पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या निमित्ताने, सुप्रसिद्ध गायक आणि या कार्यक्रमातील जज राहुल देशपांडे यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
..........
- ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाचं वेगळेपण काय सांगाल?
- ‘मी होणार सुपरस्टार’ या नावातच खूप सकारात्मकता आहे. ‘स्टार प्रवाह’सोबतचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. छान टीम असल्याने काम करायलाही मजा येते. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या स्पर्धकांसाठी ‘मी होणार सुपरस्टार’चा मंच दुसरी संधी देणार आहे. महाराष्ट्रातून शोधलेल्या ३० स्पर्धकांपैकी कोणत्या स्पर्धकांची निवड करायची हा खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे मनावर दगड ठेवून आम्ही त्यापैकी १६ स्पर्धक निवडले. १५च निवडायचे असताना १६ जणांची निवड केली. १६ स्पर्धकांमधील प्रत्येकाच्या आवाजात वेगळेपण आहे. प्रत्येकाची गाण्याची स्टाइलही खूप वेगळी आहे. मला खात्री आहे, की हे आवाज महाराष्ट्राला आवडल्यावाचून राहणार नाहीत.

- आयुष्यात दुसरी संधी किती महत्त्वाची आहे?
- अत्यंत महत्त्वाची आहे; पण त्या संधीचा तुम्ही कसा उपयोग करता हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. मला लहानपणापासून गाण्याची आवड होतीच आणि घरात संगीताचा वारसा असल्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचं बाळकडूही मिळालं आहे. संगीताची आवड जोपासताना मी ‘सीए’चं शिक्षणही घेत होतो. आपल्या सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे हे माझ्या आजोबांचे चांगले परिचयाचे होते. त्यामुळे त्यांच्या घरी येणं-जाणं व्हायचं. माझी गाण्याची आवड पाहून त्यांनीच मला संपूर्णपणे गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. माझ्या मते हा विश्वास ही माझ्या आयुष्यातली दुसरी संधी होती असं मला वाटतं. त्यामुळे ‘मी होणार सुपरस्टार’च्या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’ने दिलेल्या या संधीचं सोनं स्पर्धकांनी करायला हवं.

- या कार्यक्रमाच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कार्यक्रमाच्या ‘ग्रँड ओपनिंग’विषयी काय सांगाल?
- मी आजवर फक्त ‘ग्रँड फिनाले’ पाहिला आहे; पण एखाद्या कार्यक्रमाची इतकी ‘ग्रँड’ सुरुवात कधीच पाहिलेली नाही. त्यामुळे १२ जानेवारीचा दिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून ‘मी होणार सुपरस्टार’ची ही रंगतदार मैफल सुरू होणार आहे. उदित नारायण, सुखविंदर सिंग, शान, मिका सिंग, शाल्मली खोलगडे, नकाश अझीझ असे दिग्गज गायक पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यांची गाणी ऐकणं हा सुखद अनुभव असेल.

- ‘मी होणार सुपरस्टार’च्या सेटवरचं वातावरण कसं असतं?
- मी, मृणाल कुलकर्णी, आदर्श शिंदे आणि पुष्कर श्रोत्री अशा आम्हा चौघांचीही छान गट्टी जमून आलीय. आदर्श माझा पहिल्यापासून मित्र आहेच. पुष्करच्या एनर्जीबद्दल तर मी काय बोलू... त्याची एनर्जी कधी संपतच नाही. त्यामुळे सलग शूट केल्यानंतरही आम्हाला कंटाळा येत नाही. त्याच्याकडे पाहून नवी स्फूर्ती मिळते. मृणालचा प्रेझेन्स खूप छान आहे. ती प्रत्येकाशीच मायेने बोलते. ‘मी होणार सुपरस्टार’च्या निमित्ताने नवं कुटुंब मिळालं आहे असंच म्हणायला हवं.

- जजची भूमिका पार पाडणं अवघड आहे, असं वाटतं का?
- नक्कीच. मीसुद्धा आयुष्यात खूप स्ट्रगल करून पुढे आलो आहे. त्यामुळे न दुखावता, पण तितकंच खरेपणाने मी माझं मत सांगतो. स्पर्धकांचं टॅलेंट खरोखर थक्क करणारं आहे. त्यामुळे जज म्हणून आमचाही कस लागतोय. १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता होणारं ‘ग्रँड ओपनिंग’ आणि त्यानंतर दर शनिवार-रविवारी रात्री नऊ वाजता ‘स्टार प्रवाह’वर ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम आवर्जून पाहा.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZSOCI
Similar Posts
वहिनी ही लाडाची... ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही नवी मालिका ‘स्टार प्रवाह’वर २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. विभक्त कुटुंबपद्धतीच्या आजच्या युगात एकत्र कुटुंबपद्धतीचं महत्त्व या मालिकेतून दाखवले जाणार आहे. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या मालिकेतील भूमिकेविषयी अभिनेत्री नंदिता पाटकर यांच्याशी साधलेला हा खास संवाद
रामानंद सागरांचं ‘रामायण’ मराठीतून पाहता येणार... ११ जूनपासून! मुंबई : रामानंद सागरनिर्मित ‘रामायण’ ही पौराणिक मालिका पहिल्यांदा प्रसारित झाली होती, तेव्हा रस्ते ओस पडायचे. यंदा लॉकडाउनच्या काळात दूरदर्शनवरून ती पुन्हा प्रसारित करण्यात आली, तेव्हाही त्या मालिकेने प्रेक्षकसंख्येचा उच्चांक गाठला. आता ही मालिका प्रथमच टीव्हीवर मराठीतून प्रसारित होणार आहे.
दीपाली पानसरे करतेय कमबॅक मुंबई : देवयानी या मालिकेतून रसिकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री दीपाली पानसरे तब्बल पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ‘स्टार प्रवाह’वर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘प्रत्येक प्रॉब्लेमला आहे सोल्यूशन’ असं सांगणारी नवी मालिका ‘वैजू नंबर वन’ ऑफिसच्या वेळा, मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद... टेन्शनची कारणं एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात निरागस हास्य आणि निवांत क्षण कुठे तरी हरवत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर, धमाल मनोरंजनाचं औषध घेऊन येतेय ‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘वैजू नंबर वन.’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language