Ad will apear here
Next
‘सामान्य जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील’
पालकमंत्री विजय देशमुख यांचा विश्वास


सोलापूर : ‘सोलापूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा रुग्णालय व महिला आणि नवजात शिशु रुग्णालयामुळे गरीब, सामान्य जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील,’ असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.

सोलापूर येथे आरोग्य विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, उपमहापौर शशिकला बत्तुल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता विलास मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘आरोग्य सेवेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनामार्फत आरोग्याच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. सोलापूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेक रुग्णांना सेवा देण्यास अडचण निर्माण होत होत्या. जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा रुग्णालयाची आवश्यकता होती. नव्याने होणाऱ्या जिल्हा रुग्णालयामुळे सिव्हील हॉस्पिटलवरील ताण कमी होऊन रुग्णांना उत्तम सेवा मिळण्यास मदत होईल.’

‘प्रत्येकी २० कोटी रुपये खर्चून जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व आधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णालयाचे काम दर्जेदार व मुदतीत पूर्ण व्हावे,’ असे पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंदूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी अभियंता विलास मोरे यांनी प्रास्ताविक केले. अधिक्षक अभियंता शेलार यांनी रुग्णालयाचे बांधकाम मुदतीत केले जाईल, असे आश्वासन देऊन आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZVRBY
Similar Posts
‘टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा’ सोलापूर : ‘या वर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून टॅंकरसाठी मागणी येईल. अशी मागणी आल्यास टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिल्या.
‘आई... बाबा... मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’ सोलापूर : ‘आई... बाबा... तुम्ही मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा...!’ असा संदेश सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या पालकांना पत्राद्वारे देणार आहेत. सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे.
बार्शी पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोलापूर : ‘बार्शी तालुका पोलीस ठाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा मिळेल,’ असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी बार्शी येथे व्यक्त केला.
‘सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारणार’ सोलापूर : ‘सोलापूर व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांची चांगल्याप्रकारे साठवणूक व्हावी, त्यावर प्रक्रिया करता यावी यासाठी पणन मंडळामार्फत सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे,’ अशी घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language