
माणसाला ‘पुनर्जन्म’ असेल का, हा प्रश्न अनेकांना पडत असतो. पुनर्जन्म ही कल्पना आहे की वास्तव, यावर डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी ‘पुनर्जन्म - मिथ्य की तथ्य?’ या पुस्तकामधून चर्चा केली आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे, पुनर्जन्म म्हणजे काय, पुनर्जन्म कोणाचा आणि तो कसा व का होतो, पुनर्जन्म टाळता येतो का, पुनर्जन्मामुळे जगातील आत्मे वाढतात का, या सर्व प्रश्नांवर उत्तरे देताना लेखकाने ओशो रजनीश, खलील जिब्रान, जर्मन तत्त्वज्ञ फिडरीश निश आदी महान व्यक्तींचे विचार दिले आहेत. दोन जन्मांमधील मनुष्याची अवस्था, प्राण्यांना पुनर्जन्म असतो का, माणसांना प्राण्यांचा पुनर्जन्म मिळू शकतो का, पुनर्जन्म कोण ठरवते, तो ओळखता येतो का, त्याबद्दलचा शास्त्रीय पुरावा आदी विषयही पुस्तकात आहेत. तसेच मोक्ष, कुंडलिनी जागृती म्हणजे काय, मृत्यूसमीप जीवन अशा जवळजवळ ४९ विषयांवरील मते या पुस्तकात व्यक्त केली असून, संबंधित विषयांशी निगडित लोकांचे अनुभवही दिले आहेत.
पुस्तक : पुनर्जन्म - मिथ्य की तथ्य?
लेखक : डॉ. विद्याधर गोपाळ ओक
प्रकाशन : परममित्र पब्लिकेशन
पृष्ठे : २५९
मूल्य : ३५० रुपये
(‘पुनर्जन्म - मिथ्य की तथ्य?’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)