Ad will apear here
Next
कवितांचा श्रावण... श्रावणाच्या कविता!

...आणि म्हणता म्हणता तो आला... शेतशिवाराला चिंब करणारा, झाडा-फुलांना बहरून टाकणारा, पशु-पक्ष्यांना सुखावणारा, मनामनांना फुलवणारा, चित्तवृत्ती उल्हसित करणारा, अवघ्या चराचरालाच नवं रूपडं देणारा...तो...श्रावण आला... सर्जनाचा अनोखा आविष्कार असलेल्या या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच नातं आहे. हे लक्षात घेऊन पाऊस, निसर्ग-पर्यावरण, शेती अशा विषयांशी निगडित असलेली एक कविता श्रावण महिन्यात दररोज प्रसिद्ध करण्याचा उपक्रम दोन वर्षे राबवला होता. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही त्या कविता पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. सुरुवात करू या बालकवींच्या ‘श्रावणमास’ कवितेपासून...
............
श्रावण म्हणजे जीवनाच्या आनंदयात्रेतला एक उत्सवच जणू. ज्येष्ठ-आषाढात दमदार कोसळणारा पाऊस श्रावणात थोडा रमत-गमत, उन्हाशी लपंडाव खेळतच बरसतो. जणू काही दोन महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतरची थोडी विश्रांतीच! या काळातच सृष्टी बहरते आणि नवे रूप लेवून सजते...या वेळी अवनी धारण करत असते निसर्गदत्त सौंदर्याचा आविष्कार...आणि आकाशही त्याला अपवाद नसतं...कारण ऊन-पावसाच्या खेळातूनच नभात साकारतं सप्तरंगी इंद्रधनू...साहजिकच सारा आसमंतच मोहरून जातो आणि आपल्या जगण्याचं अवकाशही...नवा उत्साह मिळतो आपल्याला...अन् जगण्याची उमेदही...रिफ्रेश करून टाकतो हा माहौल...शहरातल्या गर्दीत कदाचित हे सारंच्या सारं नसेल मिळत अनुभवायला...पण श्रावणाचा ‘फील’ तरी नक्कीच अनुभवता येतो...अशा या उत्सवाच्या नाटकाचा पडदा आज वर जातोय...पुढचे काही दिवस पाहायला मिळेल त्याचं सुंदर नेपथ्य...आणि आपल्या जीवनाच्या नाट्याला मिळेल एक मस्त कलाटणी! 

सृजनाचा अनोखा आविष्कार असलेल्या या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच नातं आहे. हे लक्षात घेऊन पाऊस, निसर्ग-पर्यावरण, शेती अशा विषयांशी निगडित असलेली एक कविता आजपासून दररोज ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध केली जाणार आहे. सुरुवात अर्थातच बालकवींच्याश्रावणमास’ कवितेपासून...


श्रावणमास

श्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे;
क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.

वरतीं बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, 
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपीं कुणी भासे!

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तों उघडे;
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे. 

उठती वरतीं जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा.

बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरतीं ग्रहगोलचि कीं एकमतें.

फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरें सावरिती, 
सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निज बाळांसह बागडती.

खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें.

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघतां भामा-रोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें-पत्री खुडती. 

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत
वदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचें गीत.

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

(बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेबद्दल वाचण्यासाठी इथं क्लिक करा.)

फोटो : अनिकेत कोनकर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZDBBE
 मी एक शेतकरी ,
निसर्गाचा पुजारी,
म्हणोनि आवडते,
निसर्गाची बासरी11
 Very nice information8
 I like it5
 Nice5
 बालकवी माझे आवडते कवी.ही कविता मला खूप आवडते. आपल्या उपक्रमाचे स्वागत आहे10
 I like this poem "Shravanmasi" very much.I have studied it.Every year I remember this poem in the month of Shravan.5
 कविता वाचून बालपणीचा तो रम्य काळ आठवला.वर्गाबाहेर उनपावसाचा खेळ सुरू असताना वर्गात मोठ मोठाने या कवितिचे वाचन आम्ही मुले करायचो. बालपणीच्या त्या रम्य आठवणींचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद6
 Nice4
 Va Kay Kavita Aahe Balkavi is great11
 खूप छान उपक्रम....मला सहभागी व्हायला आवडेल11
 Very nice because all peoples always remember that type of poems will take happiness in their life5
 या नुसत्या कल्पनेनेच माझ्या मनात फुलपाखरं उडायला लागली3
 ही कविता वाचल्याने मन प्रसन्न होऊन जाते.5
Similar Posts
‘फुलराणी’ आणि ‘पैठणी’ कवितांचे अभिवाचन : मधुराणी प्रभुलकर निसर्गाचं अत्यंत सुंदर वर्णन आपल्या कवितांमधून करणारे कवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी. अत्यंत प्रसन्न आणि टवटवीत लेखन करणाऱ्या लेखिका-कवयित्री म्हणजे शांता शेळके. बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता आणि शांताबाईंची ‘पैठणी’ ही कविता म्हणजे एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या साहित्यकृती. मराठी राजभाषा दिनानिमित्त
बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन - स्वाती महाळंक त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा
बालकवी... प्रिय सखा फुलांचा... ओढ्यांचा सांगाती! बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे! बालसुलभ कुतुहलानं निसर्गघटितांकडे पाहणारा आणि निसर्गातल्या लोभस सौंदर्यानं बेभान होणारा शब्दसूरलहरींचा प्रवासी! त्यांच्या काव्यप्रवासाचा रसास्वाद घेणारा हा लेख त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language