Ad will apear here
Next
परब्रह्म असा जो तुकावा
तुकाराम गाथेच्या माध्यमातून तुकाराम महाराज यांनी साध्या-सोप्या, पण तितक्याच मार्मिक अभंगाद्वारे जीवन व्यवहाराचे मार्गदर्शनपर भाष्य मांडले आहे. परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेव वामन गुरुजी यांनी ‘परब्रह्मरूपी असा जो तुकावा’ या पुस्तकातून तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगांचे साध्या व सरळ भाषेत विश्लेषण केले आहे.

एक सामान्य संसारी मनुष्य ते असामान्य संतपदापर्यंतची तुकाराम महाराजांची वाटचाल त्यांच्याच अभंगातून उलगडत त्यांच्या चरित्राचे विविध पैलू यात मांडले आहेत. समाज प्रबोधनासाठी रचलेले अभंग समजावून देताना लेखकाने तुकाराम महाराजांच्या स्वभावातील बारकावेही सांगितले आहेत. तुकाराम महाराजांची विठ्ठलावर असलेली अधिकार भक्ती, निःस्पृह अयाचित वृत्ती, साडेतोड रोखठोक भाषा आणि त्यातून उमटलेली समाजाविषयीची कळकळ, विषमतेचा विरोध, असे अनेक यात आले आहेत.

तुकाराम महाराजांच्या अभंगांतून व्यक्त होणाऱ्या तत्त्वज्ञानाची ओळख करून देताना शेक्सपिअर आणि विल्यम वर्डस्वर्थ या प्रतिभावंतांच्या रचनाही अभ्यासल्या आहेत आणि त्यांची सांगड अभंगांशी घातली आहे. विषयाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी चित्रेही दिली आहेत.

पुस्तक : परब्रह्मरूपी असा जो तुकावा
लेखक : वासुदेव वामन बापट गुरुजी
प्रकाशक : यज्ञेश्वर प्रकाशन
पाने : २१८
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZNTBY
Similar Posts
श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण बासरीचे सूर आप्तस्वकीयांविरोधात लढायचे या विचाराने भर रणांगणात अर्जुन गर्भगळीत होतो; पण ही लढाई फक्त कौरव-पांडव यांच्यातील नसून ती संपूर्ण समाज, धर्मासाठी कशी आवश्यक आहे, हे कृष्णाने त्याला छंदोबद्ध काव्यातून सांगितले. ते काव्य म्हणजे गीता, असे वर्णन करून वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी ‘श्श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण
ध्यानातून ध्येयाकडे कोणतीही साधना करायची असेल, तर ध्यान आवश्यकच असतो. ध्यानामुळेच मन एकाग्र होते, तल्लीन होते असे सांगत वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी २००९ मध्ये पुष्कर क्षेत्री ‘ध्यान’ या विषयवार दहा विवेचने केली होती. ती ‘ध्यानातून ध्यायाकडे’ या नावाने ग्रंथ रूपात सादर केली आहेत.
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language