Ad will apear here
Next
टाटा मोटर्सतर्फे ५०० गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी टाटा मोटर्सतर्फे यंदा पुण्यातील इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या ५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.

गुणवत्ता चाचणीच्या आधारे या प्रत्येक उमेदवाराची निवड करण्यात आली. समता शिक्षण संस्था, सेवा सहयोग फाउंडेशन, सुप्रभात महिला मंडळ आणि स्वरूपवर्धिनी या विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने हा उपक्रम राबवण्यात आला.
   
याबाबत अधिक माहिती देताना टाटा मोटर्सच्या  ‘सीएसआर’चे प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘संस्थांचा पाठिंबा व संसाधनांच्या अभावामुळे जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षण पातळीवर गळती होते. आम्ही याच माध्यामिक टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या ‘विद्याधनम’ उपक्रमाच्या  माध्यमातून आम्ही आर्थिक पाठिंबा, खास प्रशिक्षण वर्ग याच्या मदतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यावर भर देतो. आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये आम्ही एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला.’  

‘दहा वर्षांपूर्वी आम्ही हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणामध्ये मोठी सुधारणा झाली असून, २०१५ मधील ५५ टक्क्यांवरून हे प्रमाण गेल्या वर्षी ८० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विद्यार्थ्यांचे सरासरी गुण पाच टक्क्यांनी वाढले आहेत, तर ४४ टक्के विद्यार्थ्यांनी दहावीला ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत,’ असेही कुलकर्णी यांनी सांगितले.      
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZYJCH
Similar Posts
गोळाफेक स्पर्धेत ‘सूर्यदत्ता’च्या सावरी शिंदेला रौप्यपदक पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींसाठीच्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या सावरी शिंदे हिने रौप्यपदक जिंकले. आता ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. १३.१२ मीटरचा पल्ला गाठून तिने हे यश संपादन केले
‘संगीत आणि नृत्याविष्कारामुळे जीवन सुसह्य होते’ पुणे : ‘पृथ्वीवर केवळ मानवप्राणी हा एकमेव आहे, ज्याला ईश्वराकडून कलेची देणगी मिळालेली आहे. संगीत आणि नृत्याविष्कारामुळे आपले जीवन सुसह्य झाले आहे,’ असे मत ज्येष्ठ नृत्यगुरू आणि भरतनाट्यम नृत्य कलाकार सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले. लायन्स क्लबतर्फे आयोजित कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठीच्या समूहनृत्य
मुलाच्या विवाहसमारंभात १२ शाळांना पुस्तके भेट पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके वाचायला मिळावीत, यासाठी शाळांना पुस्तके देण्याची अनेक वर्षांची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अशोक सातपुते यांनी आपल्या मुलाच्या विवाहाचे औचित्य साधले आहे. या उपक्रमाद्वारे त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language