Ad will apear here
Next
टाकाऊ घटकांपासून बनवलेल्या कपड्यांचा अनोखा फॅशन शो
पर्यावरण जनजागृतीसाठी पुण्यात अभिनव उपक्रम

पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ ही उक्ती सार्थ करत, पुण्यामध्ये चक्क कचरा या संकल्पनेवर आधारित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. मिस आणि मिसेस माय अर्थ नावाच्या या फॅशन शोमध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, इलेक्ट्रॉनिक वेस्ट (खराब झालेले की-बोर्ड, माउस, सीडी, डीव्हीडी) आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले ड्रेस सादर करण्यात आले. 

प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक कचरा यामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘माय अर्थ फांउडेशन’ तर्फे या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. वनराई संस्था, दीपाली भोसले सय्यद फांउडेशन याचे सहआयोजक होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेचेही याला सहकार्य लाभले.  


‘सौंदर्य हे अलंकार स्त्रीचे, तसेच महत्त्व पृथ्वी मातेचे’ हा संदेश याद्वारे देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सद्स्य सचिव रावेन्द्रीयन, पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, ‘माय अर्थ फांउडेशन’चे अनंत घरत, नितीन देशपांडे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद आणि मिस युनिव्हर्स खुशबू करवा व मिसेस महाराष्ट्र योगिता गोसावी, बिग बॉस फेम अभिजित बिचुकले, ललित राठी, अमित वाडेकर, यशोधन भिडे आदी मान्यवर या वेळी  उपस्थित होते.

 

अनंत घरत म्हणाले, ‘कचऱ्याला औद्योगिक महत्त्व प्राप्त झाले, तर कचरा रस्त्यावर पडणार नाही. याबाबत जनजागृती करण्यासाठी या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.’

(या  फॅशन शोची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. )

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZYMCH
Similar Posts
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
पुण्यात सुरू आहे जागतिक गो-परिषद; देशी गोवंशांच्या प्रदर्शनाचेही आयोजन पुणे : देशी गायींचे महत्त्व लक्षात येण्यासाठी आणि त्या संदर्भात जागृती करण्यासाठी पुण्यात बालेवाडी येथे कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंशाविषयीच्या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने बालेवाडीतील मोझे महाविद्यालयाच्या मैदानावर
पुरंदरच्या तरुणांच्या ‘ऑस्करवाडी’ वेबसीरिजला जगभरातून उदंड प्रतिसाद पुणे : पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावातील तरुणांनी बनवलेल्या ग्रामीण भागातील जीवनावर आधारीत ‘ऑस्करवाडी’ या मराठी वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, त्यातील ‘शेतकऱ्यालासुद्धा इज्जत आहे’ या व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language