Ad will apear here
Next
बहिणींनी पोलिसांकडे मागितली गावातील दारू बंद करण्याची ओवाळणी
मुलचेरा

गडचिरोली :
 हातात पूजेचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५०, तर कुठे ७० बहिणी पोलिसांना राखी बांधायला गेल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनवर दिसत होते. नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून गावांमधील बहिणी पोलिसांना राखी बांधायला आल्या होत्या. या वेळी महिलांनी फक्त राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर पोलिसांकडे ओवाळणी म्हणून गावातील दारू बंद करण्याचे व गावाचे दारूपासून रक्षण करण्याचे वचन मागितले. 

नारगुंडा

गडचिरोली जिल्ह्यात २७ मार्च १९९३पासून दारूबंदी आहे. परंतु अवैध रीतीने मिळणाऱ्या दारूमुळे आजही महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नवऱ्याने पैसे उडवणे असो किंवा गावात शिवीगाळ होणे असो, या सगळ्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. 

गडचिरोली

बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देण्याचा आणि वचन घेण्याचा सण म्हणून रक्षाबंधन साजरे होते. त्याच निमित्ताने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील महिलांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमधील पोलिसांना राख्या बांधल्या. ‘भाऊ, माझ्या परिवाराचे, गावाचे दारूपासून रक्षण कर. रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून गावातील दारू बंद कर’, असे आवाहन या महिलांनी पोलिसांना केले.

असरअली पोलीस स्टेशन
असरअली पोलीस स्टेशन

अशा वेगळ्या कार्यक्रमानंतर अनेक ठिकाणचे पोलिसही भारावून गेले. काही ठिकाणी पोलीस भावनिक झाले. सिरोंचा तालुक्यातील असरअली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांनी ‘१५ सप्टेंबरपर्यंत गावातील दारू बंद करीन,’ असे वचन भगिनींना दिले. गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी, ‘भगिनींनी ओवाळणीच्या रूपात पोलिसांना हक्काने त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली,’ असे उद्गार काढले. 

कोठी
कोठी येथे सुगंधित तंबाखूच्या डब्यांची होळी करण्यात आली.

भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा कोठी या मदत केंद्रावरील पोलिसांनी लगेचच गावात रॅली काढून सुगंधित तंबाखूचे डबे जप्त केले व ते भगिनींच्या उपस्थितीतच नष्ट केले. 

भामरागड ताडगाव पोलीस स्टेशन

सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, अहेरी, गडचिरोली, देसाईगंज या तालुक्यांतील पोलीस स्टेशनवर आसपासच्या गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी आपल्या पोलीस भाऊंकडे दारू बंद करण्याची ओवाळणी मागितली. 

भामरागड ताडगाव पोलीस स्टेशन

मुक्तिपथ अभियान
गडचिरोली जिल्ह्यात ज्येष्ठ सामाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने मुक्तिपथ हे अभियान सुरू आहे. ‘मुक्तिपथ’तर्फे गावाच्या पातळीवर संघटना स्थापन करण्यात आल्या असून, आपल्या गावातील दारू व तंबाखू बंद करण्यासाठी या संघटनेतील सदस्य सतत प्रयत्न करत असतात. याच मुक्तिपथ गाव संघटनेतील महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या व दारू बंद करण्याचे आवाहन केले.  

कोठी

शेती बाजूला ठेवून...
सध्या गावांमध्ये भाताच्या रोवण्या (लावणी) सुरू आहेत. तरीही या महिला रोवण्या सोडून, स्वखर्चाने पोलीस स्टेशनला आल्या आणि पोलिसांना राख्या बांधून त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावरून दारू बंद होणे त्यांच्यासाठी किती गरजेचे आहे, याचा अंदाज येईल.

वचन देणारे कार्ड
महिलांच्या स्वाक्षऱ्या असलेले एक कार्ड पोलिसांना देण्यात आले. तसेच ‘तुमच्या गावातील दारू बंद करू’ असे वचन देणारे एक कार्ड पोलिसांनीही स्वाक्षरी करून ओवाळणी म्हणून महिलांना परत दिले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZLOBR
Similar Posts
करोनामुळे दारू व तंबाखूमुक्ती झाली, तर देशाला मोठा आर्थिक, सामाजिक लाभ : डॉ. अभय बंग यांचा व्हिडिओ ‘सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे दारू दुकानांसमोर झालेली गर्दी, लांब रांगा व सोशल डिस्टन्सिंगची तोडमोड झालेली सर्वांनी पाहिली. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ‘राज्य शासनांनी घरपोच दारू पुरवण्याचा विचार करावा’ अशी सूचना केली आहे; पण घरपोच
‘व्यसनमुक्तीसाठी शासकीय विभागांनी कृतीशील व्हावे’ गडचिरोली : ‘गडचिरोली जिल्ह्याच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रमुख शासकीय विभागांनी कृतीशील व्हावे. विभागात असणारे व्यसनी कर्मचारी, लाभार्थी यांच्यासाठी कार्यक्रम आखावा,’ असे प्रतिपादन मुक्तिपथ अभियानाचे सल्लागार डॉ. अभय बंग यांनी केले.
नवे सिद्धार्थ ‘निर्माण’ होताना... अस्वस्थ तरुणांना पडलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधण्यासाठी, ‘मी’, ‘माझे’ व ‘माझ्यासाठी’ याच्या संकुचित सीमा ओलांडून, त्या पलीकडच्या वास्तवाला भिडण्यासाठी व तरुणांना त्यांच्या आयुष्याचं मिशन ठरवण्यासाठी मदत करण्याकरिता डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी ‘निर्माण’ची निर्मिती केली. गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांवर
गडचिरोली ते गुगल... स्वप्नीलची भरारी मुंबई : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील स्वप्नील बांगरे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, गुगल-युडॅसिटी शिष्यवृत्ती मिळवली आहे. युडॅसिटी नॅनोडिग्रीचा विद्यार्थी असलेल्या स्वप्नीलने आपले स्वप्न खरे करून दाखवले आहे. स्वप्नीलची युडॅसिटीमध्ये निःशुल्क अँड्रॉइड बेसिक्स अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, तो अँग्युलर जेएस अॅप्लिकेशनवर काम करत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language