भ्रातः काञ्चनलेपगोपितबहिः ताम्राकृते सर्वतो
मा भैषीः कलश स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि।
ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा तेऽधुना
नान्तःतत्त्वविचारणप्रणयिनः लोकाः बहिर्बुद्धयः॥
अर्थ : तांब्यापासून बनवलेल्या आणि बाहेरून सोन्याचा लेप देऊन ताम्रत्व लपवलेल्या हे कळसा, तू घाबरू नकोस, तर देवळाच्या वर दीर्घ काळ स्थिर हो. तुझे ताम्रत्व गेलेलेच आहे व आता तुझी कीर्ती सुवर्णमय झाली आहे. लोक आतील तत्त्वविचारांचे प्रेमी नसून, ते बाह्य बुद्धीचे असतात.
भावार्थ : देवळाचा कळस तांब्यापासून केलेला असला तरी त्याला बाहेरून सोन्याचा मुलामा दिला जातो. त्याबद्दल कवी म्हणतो, की कळसाला आपले आतले खरे रूप उघड होण्याची भीती वाटते; पण त्याने घाबरू नये. लोक बाह्य रूपालाच भुलतात.
Oh, my brother, Kalasha (a fixture on top of the temple), though you have been given a coat of gold and are made of copper body, do not fear, stay steady forever over the top of the temple. By now your identity of copper is forgotten and your golden fame has been established. People are not inclined to go deep into and find out the exact truth. They just go by outer appearance.
(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे)