यदा किंचित्ज्ञोऽहं गजरिव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञोऽस्मेत्यभवदवलिप्तं मम मनः।यदा किंचित्किंचिद्बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मेति ज्वररिव मदो मे व्यपगतः॥
मराठी अर्थ : किंचित (थोडं-थोडं) जाणणारा मी जेव्हा हत्तीप्रमाणे मदांध झालो (वा झाले), तेव्हा मी सर्वज्ञ (सगळे काही जाणणारा/जाणणारी) आहे, अशा भावनेने माझे मन गर्विष्ठ (गर्वयुक्त) झाले. परंतु शहाण्या, हुशार लोकांकडून जेव्हा मला थोडेथोडे ज्ञान मिळाले, तेव्हा मी मूर्ख आहे, अशा भावनेने माझा गर्व तापाप्रमाणे नष्ट झाला, दूर झाला.
When I had very little knowledgeable, then my arrogant mind felt like I knew everything and became blind with intoxication, like an elephant in rut. When that mind came in contact, little by little, with learned people, then I realised that I am a fool and my pride (intoxication) vanished like a fever.
(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे)