Ad will apear here
Next
महाराष्ट्राचे मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित व अॅड. प्रा. गणेश हिंगमिरे लिखित ‘जी आय मानांकन’ व ‘Intellectual Property Rights’ या पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : अॅड. प्रा. गणेश हिंगमिरे यांनी लिहिलेल्या जी आयमानांकन‘Intellectual Property Rights’ या पुस्तकाचे अनावरण मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे ही दोन्ही पुस्तकेप्रकाशित करण्यात आली आहेत. २ ऑगस्ट २०२१ रोजी राजभवन, मुंबई येथे संस्कृतीविद्यालय, पुणे यांच्या तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळीप्रमुख पाहुणे म्हणून मा. कर्नल (रिटायर) डॉ.गिरिजा शंकर मुंगली, अॅड. डॉ. सुधाकरजी आव्हाड, प्रबोध उद्योगचे संचालक रामभाऊ डिंबळे, बुकगंगा.कॉमच्या संचालिका सुप्रिया लिमये आदीमान्यवर उपस्थित होते.

Publication Ceremony

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या भाषणात म्हणाले, अॅड. प्रा. गणेश हिंगमिरेयांनी घेतलेल्या उच्च शिक्षणाचा उपयोग देशाच्या शेतकरीवर्गासाठी, त्यांच्याप्रगतीसाठी केला हे अभिनंदनास्पद आहे. कोणत्याही उत्पादनासाठी पेटंट मिळविणे खूपअवघड काम आहे, त्यासाठी गणेश हिंगमिरे यांनी जे काम केले आहे व याची माहितीशेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत घेतली आहे त्यासाठी त्यांचे कौतुक आहे. ‘IntellectualProperty Rights’ या इंग्रजी पुस्तकासोबत मराठी पुस्तक ‘जी आयमानांकन’ याचे खास करून अभिनंदन करत ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनाउपयुक्त असणारी जी आय संबंधीची माहिती अतिशय सोप्या शब्दात या पुस्तकात मांडलीआहे. या दोन्ही पुस्तकांचा उपयोग शेतकऱ्यांना प्रगती करण्यासाठी नक्कीच होईल.देशाच्या प्रगतीसाठी शेतीचा प्रमुख हातभार आहे आणि त्यासाठी गणेश हिंगमिरे जी आयआणि Intellectual Property Rights संबंधी जे काम करत आहेतत्यासाठी त्यांचे अभिनंदन आहे.

बुकगंगा.कॉमच्या संचालिका सुप्रिया लिमये आभार प्रदर्शन करताना म्हणाल्या, जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार खुले करणारी परिपूर्ण माहिती असलेली ‘जी आय मानांकन’ व ‘Intellectual Property Rights’ ही पुस्तके प्रिंट बुक आणि ई-बुक स्वरुपात प्रकाशित करण्याची व ती सर्व वाचकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आम्हाला मिळालीही खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. ‘जमिनीवर एकच तारा, शेतकरी आमचा न्यारा’ असे म्हणत त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या काही शेतकरी बांधवांचे आभार मानले. त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व अतिथींचे, आयोजकांचे, तांत्रिक टीमचे, पत्रकारांचे आभार मानले. लेखक अॅड. प्रा. गणेश हिंगमिरे यांचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, परदेशात वास्तव्य करण्याची संधी मिळूनसुद्धा देशाच्या, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावणारे गणेश हिंगमिरे यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांनी लिहिलेली ही दोन्ही पुस्तके शेतकऱ्यांना फायदेशीर ठरून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

2

3

4




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ISIHDB
Similar Posts
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.
‘मंत्रालय आणि राजभवनातही सार्वजनिक पार्किंग सुरू करावे’ मुंबई : ‘शहरातील भयावह ट्रॅफिक जाम व अडचणीच्या पार्किंग समस्येवर उपाय करण्यासाठी मुंबईमध्ये सरकारला मंत्रालय व राजभवनसहित सर्व सरकारी ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सुविधा सुरू केली पाहिजे,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली आहे. मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी वेगळे मंत्रालयही स्थापन केले जावे
नऊ नोव्हेंबरला प्रकाशित होणार ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ पुणे : केवळ आपल्या हौसेखातर चाळिशीत विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन एकच इंजिन असलेले विमान अमेरिकेतून दिल्लीपर्यंत चालवत आणण्याचा विक्रम सतीशचंद्र सोमण यांनी १९९४मध्ये केला होता. या विक्रमी प्रवासाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर, या प्रवासाची गोष्ट आता पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे
‘देवगड हापूस’ला जीआय मानांकन देवगड : देवगड हापूस आंब्यांना आता स्वत:ची ओळख प्राप्त झाली आहे. बहुप्रतीक्षित असलेले भौगोलिक निर्देशन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) अखेर देवगड हापूस आंब्यांना मिळाले आहे. देवगड हापूसच्या नावावर आता अन्य कोणत्याही प्रकारच्या आंब्यांची विक्री करता येणार नाही. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने गेली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language