Ad will apear here
Next
एक लिटर पेट्रोलमध्ये १६० किलोमीटर; पुण्याच्या अथर्वने विकसित केली इलेक्ट्रिक-पेट्रोल हायब्रिड बाइक

पुणे : एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल १६० किलोमीटर धावणारी बाइक! विश्वास बसत नाही ना; पण हे खरे आहे. अथर्व राजे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने पेट्रोलची बचत करण्यासाठी जुन्या बाइकवर संशोधन करून ही अनोखी इलेक्ट्रिक पेट्रोल हायब्रिड बाइक विकसित केली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या खर्चात बचत होईल, शिवाय ती पर्यावरणपूरकही असेल, असे त्याचे म्हणणे आहे. सध्याच्या ई-बाइक्स जास्त अंतर जाऊ शकत नाहीत. ती त्रुटी दूर करण्यासाठी त्याने हा प्रयोग केला आहे.

अथर्व राजे सिम्बायोसिस विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, त्याचे निसर्गावर प्रेम आहे. त्याने बाइकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाय शोधून काढण्याचे ठरवले. त्याने त्याच्या आईकडे असलेली बारा वर्षांपूर्वीची जुनी मोपेड गाडी संशोधनासाठी वापरली. दोन महिने कठोर परिश्रम घेऊन त्याने मोपेडचा कायापालट केला. त्यातूनच बॅटरी आणि पेट्रोलवर चालणारी ही हायब्रिड बाइक साकार झाली. 

‘सुरुवातीला पेट्रोलवर साधारण नऊ किलोमीटर धावल्यानंतर या बाइकमधील बॅटरी चार्ज होते आणि त्यानंतर ही बाइक ३२ किलोमीटर अंतर बॅटरीवर धावते. अशा प्रकारे एक लिटर पेट्रोलमध्ये बाइकची बॅटरी चार वेळा चार्ज होते. अशा प्रकारे ही बाइक एक लिटर पेट्रोलमध्ये एकूण १६० किलोमीटर धावते,’ असे अथर्व राजे याने सांगितले. 

सध्या बॅटरीवर चालणाऱ्या ज्या बाइक्स आहेत, त्या एका चार्जिंगमध्ये जास्तीत जास्त ४० ते ५० किलोमीटर अंतर जाऊ शकतात. पेट्रोल पंपाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगची सोय नसल्याने या इलेक्ट्रिक बाइकद्वारे जास्त अंतर जाता येत नाही, ही सध्याची अडचण आहे. याचा विचार करूनच अथर्वने ही हायब्रिड बाइक तयार केली आहे. त्यामुळे चार्जिंग संपल्यानंतर ही बाइक पेट्रोलवर धावते आणि त्या वेळी पुन्हा बॅटरी चार्ज होते. त्यामुळे पुढील प्रवास बॅटरीवर करता येतो.

या बाइकमुळे प्रदूषणात ७५ टक्के घट होईल, असा अथर्वचा दावा आहे. ‘सध्याच्या दुचाकी कमी अॅव्हरेज देतात. कालांतराने ते आणखी कमीच होत जाते. त्यामुळे अधिक पेट्रोल वापरले जाते आणि अधिक खर्च येतो. तसेच पर्यावरणाचेही नुकसान होते. याचा विचार करून ही बाइक विकसित केली आहे,’ असे अथर्वने सांगितले. 

या बाइकसाठी त्याला गुजरात सरकारमार्फत एक्सेप्शनल इनोव्हेशन अॅवॉर्ड मिळाले असून, राष्ट्रीय पातळीवरही या बाइकचे कौतुक झाले आहे. अथर्वने या बाइकच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. 

(या हायब्रिड बाइकची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत)BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZUQCG
Similar Posts
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
ट्रिनिटी अॅकॅडमीत साकारणार एक लाख वृक्षांची देवराई पुणे : ‘जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी स्वच्छ, निरोगी वायू देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करणे खूप गरजेचे आहे. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या देशी वृक्षांपासून आपल्याला शुद्ध हवा, फुले आणि मधुर फळे मिळतात. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वाढदिवस किंवा
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
पुरंदरच्या तरुणांच्या ‘ऑस्करवाडी’ वेबसीरिजला जगभरातून उदंड प्रतिसाद पुणे : पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावातील तरुणांनी बनवलेल्या ग्रामीण भागातील जीवनावर आधारीत ‘ऑस्करवाडी’ या मराठी वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, त्यातील ‘शेतकऱ्यालासुद्धा इज्जत आहे’ या व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language