Ad will apear here
Next
ध्यानातून ध्येयाकडे
कोणतीही साधना करायची असेल, तर ध्यान आवश्यकच असतो. ध्यानामुळेच मन एकाग्र होते, तल्लीन होते असे सांगत वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी २००९ मध्ये पुष्कर क्षेत्री ‘ध्यान’ या विषयवार दहा विवेचने केली होती. ती ‘ध्यानातून ध्यायाकडे’ या नावाने ग्रंथ रूपात सादर केली आहेत. 

ध्यान म्हणजे नेमके काय, हे अभ्यासताना अध्यात्मिक संदर्भ, वैद्यानिक संदर्भ, ध्यान कशासाठी करायचे, ध्यान कोणी व कसे करावे, ध्यानयोगाची मर्यादा, नियम, आसन, प्रत्याहार, समाधी याबद्दल माहिती दिली आहे. ध्यान करताना येणारे अडथळे व त्यावरील उपायही दिले आहेत. 

ध्यानासाठी सहाय्यक गोष्टी, तयारी, तसेच विविध उपाय केले, तरी मन एकाग्र होत नसेल त्या वेळी त्या ध्यानासाठी कोणत्या बाह्य प्रतीकांची निवड करावी, नाम, मंत्र, स्तोत्र, ऋचा आदी ध्वनींच्या प्रकारांवर केल्या जाणाऱ्या ध्यानपद्धतीचा अभ्यास, प्रकाश शक्तीवरील ध्यान, श्वासगतीवरील ध्यान, कुंडलिनी महायोग आदी विषयांवर माहिती यातून मिळते.      

प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे
पाने : २६३
किंमत : २७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZWXBV
Similar Posts
श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण बासरीचे सूर आप्तस्वकीयांविरोधात लढायचे या विचाराने भर रणांगणात अर्जुन गर्भगळीत होतो; पण ही लढाई फक्त कौरव-पांडव यांच्यातील नसून ती संपूर्ण समाज, धर्मासाठी कशी आवश्यक आहे, हे कृष्णाने त्याला छंदोबद्ध काव्यातून सांगितले. ते काव्य म्हणजे गीता, असे वर्णन करून वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी ‘श्श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण
परब्रह्म असा जो तुकावा तुकाराम गाथेच्या माध्यमातून तुकाराम महाराज यांनी साध्या-सोप्या, पण तितक्याच मार्मिक अभंगाद्वारे जीवन व्यवहाराचे मार्गदर्शनपर भाष्य मांडले आहे. परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेव वामन गुरुजी यांनी ‘परब्रह्मरूपी असा जो तुकावा’ या पुस्तकातून तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगांचे साध्या व सरळ भाषेत विश्लेषण केले आहे
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही
आरोग्य तुमच्या हातात - अर्थात रोगानुसार योगा आपल्या सर्वांकडे एक गोष्ट समान असते ती म्हणजे शरीर. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्त्वाचा ठरतो. या गोष्टींकडे लक्ष वेधत प्रा. दिनेश भालके यांनी ‘आरोग्य तुमच्या हातात अर्थात रोगानुसार योगा’मधून योगाभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language