मुंबई : ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने १६ मार्च २०१८ रोजी ‘प्रमोटर, भारताचे राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्रालय, भारत सरकार’ यांच्यामार्फत, विक्री ऑफरच्या (ऑफर) माध्यमातून दर्शनी मूल्य दहा रुपये असलेले ३४,१०७,५२५ समभाग प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओच्या स्वरुपात खुले करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
या प्रस्तावामध्ये ३३,४३८,७५० समभागांचा निव्वळ प्रस्ताव असून, ६,६८,७७५ समभागांपर्यंत भाग कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे. कंपनीच्या ऑफर देण्यापूर्वीच्या आणि ऑफर दिल्यानंतरच्या पेड-अप समभाग भांडवलामध्ये, ऑफर आणि निव्वळ ऑफरचा वाटा अनुक्रमे १०.२० टक्के आणि १० टक्के एवढा असेल.
ऑफरसाठी दरसूची १,२१५ रुपये ते १,२४० रुपये प्रति समभाग, अशी निश्चित करण्यात आली आहे. रिटेल खरेदीदारांना तसेच, बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किमतीवर प्रति समभाग २५ रुपयांची सवलत दिली जाणार आहे. किमान १२ समभागांसाठी आणि १२च्या पटीत कितीही समभागांसाठी बोली लावता येईल.
बोली/प्रस्ताव २० मार्च, २०१८ रोजी बंद होणार आहे. हे समभाग ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’च्या सूचीमध्ये समाविष्ट केली जातील, असे सूचित करण्यात आले आहे.
या प्रस्तावासाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) म्हणून ‘एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ आणि ‘अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड’ यांनी काम पाहिले.
‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात् सेबीच्या नियमानुसार, पात्र संस्थात्मक खरेदीदारांना प्रमाणबद्ध वाटप (क्यूआयबी पोर्शन ) करताना, निव्वळ ऑफरच्या ५० टक्क्यांहून अधिक समभाग उपलब्ध करून दिले जाऊ नयेत, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ पाच टक्के भाग म्युच्युअल फंडांना प्रमाणबद्ध पद्धतीने उपलब्ध करून दिला जाईल. उरलेला क्यूआयबी पोर्शन म्युच्युअल फंडांसह सर्व पात्र संस्थात्मक खरेदीदारांना, त्यांनी लावलेल्या वैध बोलींच्या आधारावर किंवा ऑफर दरांहून चढ्या दरांना उपलब्ध करून दिला जाईल. अ-संस्थात्मक खरेदीदारांना प्रमाणबद्ध रितीने वितरण करण्यासाठी, निव्वळ ऑफरच्या किमान १५ टक्के समभाग उपलब्ध करून दिले जातील आणि रिटेल व्यक्तिगत बोली लावणाऱ्यांसाठी सेबीच्या आयसीडीआर नियमांनुसार नेट ऑफरच्या किमान ३५ टक्के समभाग उपलब्ध करून दिले जातील. हे वितरण त्यांच्याकडून येणाऱ्या वैध बोलींवर अवलंबून असेल, किंवा ऑफर दरांच्या तुलनेत चढ्या दराने होईल.
याशिवाय, ६,६८,७७५ अतिरिक्त समभाग पात्र कर्मचाऱ्यांना प्रमाणबद्ध रितीने वितरित करण्यासाठी राखून ठेवले जातील. हे वितरण कर्मचाऱ्यांकडून आलेल्या वैध बोलींनुसार, किंवा ऑफर दरांच्या तुलनेत चढ्या दरांना होईल. बोली लावणाऱ्या प्रत्येकाला, अवरोधित रक्कम प्रक्रियेतून गेलेल्या (एएसबीए) अर्जांद्वारे ऑफरमध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेमध्ये अर्जदारांना आपल्या एएसबीए खात्यांचे तपशील पुरवावे लागतील. याच खात्यांमध्ये बोलीची रक्कम एससीएसबींतर्फे ब्लॉक केली जाईल.