Ad will apear here
Next
...आणि ‘त्यांच्या’ही डोळ्यांत उजळली दिवाळी!
गरीब मुलांनी घेतला शाही अभ्यंगस्नानाचा आणि फराळाचा आस्वाद

पुणे : सुंदरसा पाट, रांगोळ्यांचा थाट, सुगंधी तेल-उटण्याचा सुवास, औक्षणाचे ताट, नव्या कपड्यांचा साज आणि गोडाचा घास यामुळे ‘त्यांच्या’ डोळ्यांत दिवाळीच्या लाख लाख दीपांचे तेज झळकत होते. चेहरे आनंदाने फुलबाज्यांसारखे खुलले होते.. हे दृश्य होते नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या अनोख्या दिवाळीचे.  

माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी पदपथावर राहणाऱ्या मुलांसाठी शनिवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी शाही अभ्यंगस्नानाचे आयोजन केले होते. खेळण्या-बागडण्याचे, शिकण्याचे वय असतानाही परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. ‘ना दसरा ना दिवाळी’ असे खडतर जीवन जगणाऱ्या या मुलांना आपल्याप्रमाणेच दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी बागुल पिता-पुत्र आणि मित्रपरिवाराने गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. 


यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला. या परिसराची स्वछता करून कार्यकर्त्यांनी येथे रांगोळ्या घातल्या होत्या. त्यावर पाट मांडून प्रत्येक मुलाला उटणे लावून स्नान घालण्यात आले. त्यानंतर औक्षण करून, नवे कपडे आणि फराळ देण्यात आला. आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल, हर्षदा बागुल  आणि समस्त बागुल कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांनी या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान घातले. या उपक्रमात जयेश कासट, इम्तियाज तांबोळी, सागर आरोळे, चंद्रशेखर पिंगळे, धनंजय कांबळे, गोरख मरळ, महेश ढवळे, योगेश निकाळजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

‘आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. पदपथावर राहणाऱ्या मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत असतो. त्याबरोबरच वर्षभर विधायक उपक्रम राबविले जातात,’ असे संयोजक अमित बागुल यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZSMCF
Similar Posts
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
पोलीस बांधवांसमवेत दीपोत्सव पुणे : आपल्याला सण, उत्सव आनंदात साजरे करता यावेत, यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, स्वछता कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी वंदेमातरम् संघटनेचे युवा वाद्य पथक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव साजरा करण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language