लोकसाहित्य, लोककला आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भवाळकर आणि दलित चळवळ पुढे नेणारे साहित्यिक वामन होवाळ यांचा एक एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... ......
तारा भवाळकर
एक एप्रिल १९३९ रोजी जमलेल्या तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.
अभ्यासक स्त्रिया, आकलन आणि आस्वाद, लोकनागर रंगभूमी, लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा, लोकांगण, लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा, मरणात खरोखर जग जगते, मातीची रूपे, माझिये जातीच्या, निरगाठ सुरगाठ, संस्कृतीची शोधयात्रा, स्नेहरंग, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, तिसऱ्या बिंदूच्या शोधात, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, मिथक आणि नाटक - असा त्यांचा लेखन प्रसिद्ध आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
त्यांना सु. ल. गद्रे साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
(तारा भवाळकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) ........
वामन होवाळ एक एप्रिल १९३९ रोजी सांगलीमधल्या तडसरमध्ये जन्मलेले वामन होवाळ हे दलित साहित्य चळवळीमध्ये मोलाचं योगदान देणारे साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या काही कथांचे हिंदी, उर्दू, कन्नड, इंग्लिश आणि फ्रेंच भाषेत अनुवाद झालेले आहेत.
कथालक्ष्मी, सत्यकथा, राजश्री, यशवंत, धनुर्धारी सारख्या मासिकांतून, तसंच अस्मितादर्श या नियतकालिकामधून ते कथा लिहीत असत. त्यांनी ग्रामीण जीवनावर, मुंबईतील झोपडपट्टीमधल्या दलितांच्या जीवनावर प्रामुख्याने लेखन केलं होतं. ते उत्तम कथकथानकार होते.
येळकोट, बेनवाड, ऑडिट, वाटा-आडवाटा, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
२३ डिसेंबर २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.