आपल्या सर्वांकडे एक गोष्ट समान असते ती म्हणजे शरीर. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्त्वाचा ठरतो. या गोष्टींकडे लक्ष वेधत प्रा. दिनेश भालके यांनी ‘आरोग्य तुमच्या हातात अर्थात रोगानुसार योगा’मधून योगाभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे.
योगासने व प्राणायाम हा सर्वांत स्वस्त व मस्त व्यायामप्रकार आहे हे सांगून विविध व्याधींमध्ये उपयुक्त आसनांची माहिती त्यांनी दिली आहे. आसनाची कृती, फायदे व छायाचित्रे दिल्याने आसन करणे सहज शक्य होते. यात मधुमेह, वजन जास्त असणाऱ्या व्यक्ती, स्त्रियांच्या अनियमित मासिक पाळीचे दोष, उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, दमा व फुफ्फुसाचे विकार, शरीराच्या हालचाली कमी करू शकणाऱ्या विशेष व्यक्तींना उपयुक्त आसने यात दिली आहेत. तसेच काही साध्या, सोपी आसनेही यात दिली आहेत. याशिवाय डोळ्यांचे, पायांसाठी व्यायाम, प्राणायम कसा करावा, याबद्दलही सांगितले आहे.
पुस्तक : आरोग्य तुमच्या हातात - अर्थात रोगानुसार योगा
लेखक : प्रा. दिनेश भालके
प्रकाशक : श्रुतस्पंदन प्रकाशन, मुंबई
पाने : २८४
किंमत : २९९ रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)