
बेकरी उत्पादने हल्ली अनेकदा खाण्यात येतात. बिस्किटे, पाव, खारी, टोस्ट, बटर या शिवाय बेकरी उत्पादनातील सर्वांत खपाचा व लोकप्रिय प्रकार म्हणजे केक. हे सर्व पदार्थ जेथे तयार होतात, त्याला ‘बेकरी’ म्हणतात. बेकरी व्यवसायासाठी काय आवश्यक असते, याची सखोल माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी ‘बेकरी बेकरी’मधून दिली आहे.
ब्रेडमधील महत्त्वाचा घटक असलेला मैदा म्हणजे नेमके काय असते, तो कसा तयार केला जातो, त्याचे प्रकार, गुणधर्म, परीक्षण याबद्दल सांगितले आहे. बेकरीतील पाणी व्यवस्था, क्षार, मसाल्याचे पदार्थ, स्वादाचे पदार्थ, खाद्यरंग, फळे व फळबिया, कोको आणि चॉकलेट या घटकांची अगदी सर्व माहिती दिली आहे.
उत्तम ब्रेड तयार करण्याची पद्धत, ब्रेडची पत सुधारणे, ब्रेडचे प्रकार, ब्रेड शिळा होणे अशी ब्रेडची तसेच केक, कुकीज, खारी, डोनट्स, बिस्किटे यांची माहिती देऊन पाककृतीही दिल्या आहेत उत्पादन व व्यापारातील व्यावसायिक चूक, हिशेबाचे महत्त्व आदी सर्व विषयावर मार्गदर्शन केले आहे.
पुस्तक : बेकरी बेकरी
लेखक : विष्णू मनोहर
प्रकाशक : राजा प्रकाशन
पाने : २४०
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)