
योग, कुंडलिनी व श्वासोच्छ्वास हा त्रिकोण म्हणजे शरीराची प्राणशक्ती आहे. मन एकाग्र केल्यानंतर कालांतराने समाधी अवस्था येते. श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व त्यातून पुढे कुंडलिनी जागृती सुरू होते. हे त्वरेने शक्य नसले, तरी रोजची बैठक, ध्यान साधना यातून आपल्या शरीरातील कुंडलिनी जागृत करू शकतो. आध्यात्मिक वाटचालीत कुंडलिनी जागृती हा महत्त्वाचा टप्पा असतो. हे होते कसे, तेव्हा शरीराची अवस्था कशी असते, मनातील विचार काय असतात, याबद्दलची माहिती व मागदर्शन डॉ. अविनाश चाफेकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कुंडलिनी जागृतीचे अस्तित्व वैज्ञानिक भाषेतही समजावून सांगितले आहे.
कुंडलिनी जागृत झाल्यावर शरीराची उष्णता वाढते. त्यातून मेंदूतील विद्युत लहरी, स्नायूंमधील विद्युत लहरी, त्वचेवर इलेक्ट्रोड्स लावून सलगपणे घेतलेले तापमान, श्वासोच्छ्वासातील चढ-उतार याबाबत केलेला प्रयोग त्यांनी येथे सांगितला आहे. अध्यात्म व विज्ञान या कसोट्यांवर कुंडलिनी शक्तीचे अस्तित्व त्यांनी दाखविले आहे. ग्रंथ आणि समकालिनांचा कुंडलिनीचा अनुभव यातून दिला आहे.
पुस्तक : कुंडलिनी शक्ती
लेखक : डॉ. अविनाश चाफेकर
प्रकाशक : उषा अनिल प्रकाशन
पाने : १३२
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)