Ad will apear here
Next
‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’मध्ये रुफटॉप सोलर प्लॅंट
पुणे : भारतातील सर्वांत मोठी रुफटॉप सोलर डेव्हलपर असलेल्या आणि या बाजारपेठेत १५.८ टक्के हिस्सा असलेल्या ‘क्लिनमॅक्स सोलर’ कंपनीने पुण्यातील ‘आयसीएआर – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’साठी रुफटॉप सोलर प्लँट विकसित आणि कार्यान्वित केला आहे. ७० केडब्ल्यूपी क्षमतेच्या या रुफटॉप ग्रिड सोलर इन्स्टॉलेशनचे उद्घाटन ‘डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड एज्युकेशन’चे (डीएआरई) सचिव, तथा ‘आयसीएआर’चे सरसंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्र आणि संचालक डॉ. एस. डी. सावंत यांच्या हस्ते झाले. 

अंदाजे ७० चौरस फूट क्षेत्रात पसरलेला हा रुफटॉप सोलर प्लँट वीजवितरण जाळ्याशी जोडण्यात आला असून, त्यातून वर्षाला एक लाख केडब्ल्यूएच वीजनिर्मिती होण्याचा अंदाज आहे. रिसर्च सेंटरमध्ये स्थापित केलेला हा प्रकल्प ‘पे ॲज यू गो’ अथवा ‘ओपीईएक्स’ प्रारुपावर आधारित आहे. तो गुंतवणूक मुक्त, जोखीम मुक्त व अडथळा मुक्त असून, तो वीज जाळ्यापेक्षा जवळपास सरासरी ३० टक्के स्वस्त दरात वीजपुरवठा करु शकेल.

यासंदर्भात ‘क्लिनमॅक्स सोलर’चे सहसंस्थापक अँड्र्यू हाइन्स म्हणाले, “कंपन्यांना रुफटॉप सोलर सोल्यूशन्स देण्याच्या उद्योगातील आघाडीची कंपनी या नात्याने, आम्हाला सरकार व संस्थात्मक ग्राहकांना सौरऊर्जेचा वापर करण्यात मदत करण्याची मोठी संधी मिळाली आहे. आयसीएआरला शाश्वतता ध्येये गाठण्यास आणि त्याचवेळी खर्चबचत साधण्यात मदत करण्याने आमचा गौरव झाला आहे.”

ते पुढे म्हणाले, “सरकारी विभाग वाढत्या संख्येने आपल्या इमारतींचे सौरविद्युतीकरण करण्याचे आव्हान पेलताना बघून आम्हाला आनंद होत आहे. पुण्यातील हा प्रकल्प त्याच्या कार्यकाळात ९९ टन कार्बन डाय ऑक्साईड कमी करण्याचा अंदाज आहे. आयसीएआर, आयआयटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, कर्नाटकातील सुरत्कल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) तसेच पुणे, मुंबई व बंगळुरुतील आयकर भवन, प्रतिष्ठा भवन, कस्टम्स अँड एक्साईज बिल्डिंग यांनी आमची सोलर सोल्यूशन्स अंगीकारली आहेत.”

‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’ ही संस्था सुरक्षित द्राक्ष उत्पादन व उत्पादकता, द्राक्षांच्या सुधारित व शाश्वत उत्पादनासाठी सहयोगींना तंत्रज्ञान हस्तांतर व क्षमता वर्धन पुरवण्यात व्यूहात्मक व उपयोजित संशोधन करण्यात नैपुण्य प्राप्त केलेली आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZVEBJ
Similar Posts
‘उबर इट्स’ची सेवा पुण्यात सुरू पुणेः घरपोच खाद्यसेवा देणारे ‘उबर इट्स’ हे ऑन डिमांड फूड डिलिव्हरी अॅप आता पुणे शहरातही दाखल झाले आहे. याद्वारे तीनशे रेस्टॉरंटसशी भागीदारी करून पुणे शहर व आजुबाजूच्या परिसरातील ग्राहकांना खाद्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.  सध्या विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि संगमवाडी या परिसरात
पीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू पुणे : शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे नवीन दालने सुरू केली आहेत.
स्वादिष्ट वॅफल्सची दुनिया ... आता फर्ग्युसन रोडवर पुणे : ‘वॅफल्स’ हे मुळचे पाश्चात्त्य मिष्टान्न भारतीयांना अगदीच काही नवीन नाही, मात्र आता ते सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे खवैय्यांमध्ये ‘वॅफल्स’ची चलती दिसून येत आहे. पुणेकर खवैय्यांनाही ‘वॅफल्स’ने भुरळ घातली आहेच. अशा या अनोख्या ‘वॅफल्स’ची दुनियाच फर्ग्युसन रोडवर खुली झाली आहे. विशेष म्हणजे
‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ पुणे : दर्जेदार सॉलिडवूडपासून बनलेल्या आकर्षक डिझाइन्सच्या फर्निचरचे ‘सोलवूड व्हेंचर’ हे भव्य पाच मजली दालन कोंढवा येथे सुरू झाले असून, नुकतेच याचे उद्घाटन अभिनेते सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, निवृत्त अप्पर वनरक्षक पांडुरंग मुंढे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language