Ad will apear here
Next
हॅलो मी प्रतिमानव
शाळा-महाविद्यालयीन पुस्तकांमधील विज्ञान हे आपल्या रोजच्या जीवनचाच भाग असते. सध्याच्या यांत्रिक युगात तर विज्ञानशिवाय पान हालत नाही. यंत्रमानवासारख्या संकल्पना काही वर्षांपूर्वी काल्पनिक वाटत होत्या, त्या आता प्रत्यक्षात आल्या आहेत. यातूनच शरद पुराणिक यांनी विज्ञानरंजक कथा ‘हॅलो मी प्रतिमानव’मध्ये लिहिल्या आहेत.

गरिबीतून शिक्षण घेऊन नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरीत निवड झालेले सविता व रवी हे कालयंत्रातून प्रवास करणारे पहिले प्रवासी ठरतात व त्यातून ते पुन्हा भूतकाळात जातात. ‘दिवटा’मध्ये पंचाहत्तरी ओलांडलेल्या आजोबांच्या विशेष नातवाला बरे करण्यासाठी न्यूरोसर्जन डॉ. दिनकर कृत्रिम मेंदूचे रोपण करतात. त्यानंतर विराज हा बुद्धिमान, पण कॉमनसेन्स नसलेला विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. कृत्रिम मेंदुप्रमाणेचे कृत्रिमरीत्या गर्भधारणा म्हणजे पुरुषाच्या मिलनाशिवाय महिलेला गर्भधारणा होऊ शकते, हा पाचारणे सरांचा प्रयोग स्वत: वर करून घ्यायला निशा तयार होते अन् नंतर तो कसा यशस्वी ठरतो, हे ‘बिन बापाची मुलगी’ या कथेतून सांगितले आहे. अशा विज्ञानरंजनपर १९ कथा यात आहेत.

पुस्तक : हॅलो मी प्रतिमानव
लेखक : शरद पुराणिक
प्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : १६६
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVSBW
Similar Posts
या कातरवेळी जन्म मृत्यूदरम्यानच्या जीवनातील सर्व अवस्थांपैकी वृद्धत्व ही काहीशी घाबरवून सोडणारी अवस्था असते; मात्र ती जीवनाची परीपूर्णताही असते, हे लक्षात घेऊन या अवस्थेला सामोरे जाण्याची ताकद प्रत्येकानेच मिळवायला हवी.
आनंदवनाचा विकास कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या ध्येयाने बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनात आनंद फुलविला. त्यांचे पुत्र डॉ. विकास आमटे यांनी बाबांचा वसा पुढे नेला. या विकासपुत्राची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा विकास’मधून कथन केली आहे.
योग्य नोकरी मिळवताना नोकरी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. नोकरी म्हटले की, मुलाखत ही पहिली पायरी मग तिचे तंत्र आणि मंत्र शिकणे हेदेखील ओघानेच आले. योग्य नोकरी मिळवताना या पुस्तकात मुलाखतीच्या तंत्रापासून व्यक्तिमत्त्व विकासापर्यंत अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. अगदी रेझ्युम लिहिण्यापासून ते कपड्यांची
सत्यजित ‘सत्यजित’ या कादंबरीचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language