Ad will apear here
Next
श्‍याम बेनेगल यांनी टोचले विद्यार्थ्यांचे कान


एफटीआय विद्यार्थी आंदोलन प्रकरण

पडद्यावरील कामगिरी महत्त्वाची नाही

सर्वच नियुक्‍त्या असतात राजकीय हेतूने प्रेरीत

नवी दिल्ली - पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे समर्थनीय नसल्याचे मत याच संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विख्यात दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बेनेगल बोलत होते.

भाजपचे नेते आणि अभिनेते गजेंद्र चौहान यांनी अध्यक्षपदाच्या नियुक्तीआधी पडद्यावर काय कर्तृत्त्व दाखवले हे येथे महत्त्वाचे नसून त्यांचा व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव आपण घेतलेलाच नाही, तर टीका करण्यात काय हशील आहे, असे बेनेगल यांनी विचारले आहे.

चौहान यांच्या नियुक्तीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला जात आहे. त्याविषयी बेनेगल म्हणाले की, अशा प्रत्येकच नियुक्तीमध्ये राजकीय हेतू असतातच. आपणही काही राजकीय हेतू मनात बाळगूनच काम करत असतो. आधीच्या सर्व सरकारनीही राजकीय हेतूनेच अनेक नियुक्‍त्या केल्या होत्या. त्यामुळे चौहान यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात काहीही अर्थ नाही. प्रत्येकच सरकार त्यांच्या भूमिकेला अनुसरुन नव्या नियुक्‍त्या करत असते. त्यात वावगे काहीही नाही. असे असताना नको त्या विषयावरुन वादंग का माजवला जात आहे, हे समजत नसल्याचे बेनेगल म्हणाले.

इन्स्टिट्युटच्या अध्यक्षांना भेटून आपले गैरसमज दूर करुन घेणे अथवा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे विद्यार्थ्यांना शक्‍य होते. मात्र, त्यांनी ते न करता, थेट बेमुदत बंदचे हत्यार उपसले आणि संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराव घातला, जे सर्वस्वी चुकीचे आहे.

सन 1980 ते 1983 आणि सन 1989 ते 1992 असे दोनवेळा बेनेगल या संस्थेचे अध्यक्ष होते. आपल्यालाही विद्यार्थ्यांनी घेराव घालून रात्रभर कोंडले होते. मात्र, त्यावेळी आपण पोलिसांना न बोलावता चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवल्याची आठवणही बेनेगल यांनी सांगितली.


 गजेंद्र चौहान यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांचे निर्णय जर खरेच संस्थेच्या हिताचे राहणार नसतील तर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे. कोणत्याही समस्येवर चर्चा हा एक लोकशाही मार्ग असतो. मात्र, आंदोलक विद्यार्थी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. शिवाय राजकीय नेतेही विनाकारण य विषयात लक्ष घालत आहेत, असे वाटते.

                                                               - शाम बेनेगल, विख्यात दिग्दर्शक

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZKFAH
Similar Posts
अकोले तालुक्‍यात कॉंग्रेस पक्षाला घरघर पक्षांतर्गत गटबाजीने वाताहत : पक्ष अवस्थेकडे विरोधी पक्षनेत्यांचेही दुर्लक्ष  जि.प., पं.स.ला उमेदवार देताना दमछाक  मधुकर नवलेंच्या सोडचिठ्ठीने आणखी वाताहत अकोले, दि. 13 (प्रतिनिधी) - दीर्घ परंपरा असणाऱ्या अकोले तालुका कॉंग्रेस पक्षाला घरघर लागल्याचे पुढे आले आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या जिल्ह्यातील कॉंग्रेस
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन शिलॉंग - भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न आणि मिसाईल मॅन अशी ओळख असणारे दिग्गज शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी आकस्मिक निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मेघालयची राजधानी शिलॉंगमध्ये एक व्याख्यान देत असताना ते व्यासपीठावर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली
आता जिल्ह्यातल्या पोस्ट ऑफिसमध्येच पासपोर्ट मिळणार! नवी दिल्ली : आता पासपोर्ट काढण्यासाठी आपल्या जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. कारण पासपोर्ट संबंधित सर्व कामे आता जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्येच होणार आहेत. जिल्ह्याचे मुख्य पोस्ट ऑफिस हेच आता पासपोर्ट सेवा केंद्र असेल, अशी घोषणा परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी केली. व्ही.के.सिंह
अर्थसंकल्पाची निर्मिती... नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी यंदाचे रेल्वे आणि अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. दोन्ही अर्थसंकल्पामधून सर्वसामान्याच्या पदरात काय पडेल हे कोणालाच माहित नाही परंतू, काही तरी चांगले होणार याची अपेक्षा मात्र सर्वजण करत आहेत. या दोन्ही बजेटची निर्मीती कशी होते ?कोण याची निर्मीती करते ?कोणत्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language