Ad will apear here
Next
यसन
‘यसन’ म्हणजे बैलाच्या नाकात घातलेली दोरी. याचे नियंत्रण गाडीवानाकडे असते. अशा अनेक ‘यसनी’ माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असतात. यामुळे त्याचे जीवन कचाट्यात सापडते, असे कथन करीत ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी ‘यसन’ या कादंबरीतून ऊसतोडणी मजुरांचे ‘जीणं’ उभे केले आहे. 

ऊस काढणीच्या वेळेस फडातच कादंबरीच्या नायकाचा जन्म झाला. पहिल्या मुलीनंतर मुलगा जन्माला आल्याने वडील बाप्पाला खूप आनंद होतो. सगळे जीवन ऊसतोडणीत गेलेल्या आई-वडिलांना मुलगा वामनला (बबड्या) शाळेत घालण्याचे ठरवतात. मास्तरांची बोलणी खात शिक्षण सुरू होते अन् बबड्याचे मन त्यात रमते. 

घरी दैन्यावस्था असली, तरी आई व ‘माय’च्या प्रेमात आणि संस्कारात बबड्या मोठा होत असतो. सातवीनंतर माळेगावची बोर्डिंगची शाळा आधी आवडली नाही म्हणून पळून गेलेला वामन नंतर गुरुजींच्या संगतीमुळे शाळेतील चांगला मुलगा ठरतो. बारावीनंतर नोकरीचा शोध व अनुभव, पुढील शिक्षणानंतर रोजीरोटीचा प्रश्न, सुशिक्षित तरुणांच्या व्यथा, लग्नाचा प्रश्न या सर्व समस्यांना सामोते जाणाऱ्या नायकाचे जगणे यात रंगविले आहे. 

पुस्तक : यसन
लेखक : ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर
प्रकाशक : स्वयंदीप प्रकाशन
पाने : २६० 
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZTFCC
Similar Posts
नागवेल ‘नागवेल’ कादंबरीचा परिचय...
नोबेल विजेता विनोद मोहिते आणि त्याची प्रेयसी विशाखा आपटे या दोघांभोवती फिरणारी ही उत्तम कदम यांची कादंबरी आहे. कादंबरीच्या प्रारंभीच वधस्तंभाकडे जाणारा धीरोदात्त नायक विनोद मोहिते समोर येतो मात्र, चमत्कार घडावा तशी त्याची फाशीची शिक्षा रद्द होते. फाशी रद्द होण्याचे कारण काय, मुळात त्याला फाशीची शिक्षा होण्याचे कारण काय, या सगळ्याची उत्तरे कादंबरीतून मिळतात
भेद्य अभेद्य उषा पुरोहित यांची ही सामाजिक कादंबरी आहे. शहरी मध्यमवर्गीय संस्कृती, जीवन कादंबरीतून समोर येते. स्वातंत्र्यपूर्व आणि तत्कालिक स्वातंत्र्योत्तर काळही दिसतो. ‘भेद्य आहेत त्या माणसा-माणसांमध्ये उभ्या केलेल्या भिंती आणि अभेद्य आहेत त्या त्या समाजपुरुषाला कुटिलतेने अपमानित करणाऱ्या विषप्रवृत्ती’, असे लेखिका प्रस्तावनेत म्हणतात
काळोखातील सावली ‘काळोखातील सावली’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी जागृत आदिशक्तीबद्दलची आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language