Ad will apear here
Next
चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धात भारतासाठी संधी


अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय दर्जा साध्य करून, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून निर्यातीमध्ये चांगलीच वाढ करू शकतो. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धामध्ये भारतासाठी निश्चितच संधी दडलेल्या आहेत. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १३वा भाग..
......
‘अमेरिकेने चिनी मालावर २५ टक्के आयातकर वाढवला... त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकी उत्पादनांवर ५० टक्के आयातकर वाढवला...’ अशा बातम्या आपल्या कानावर अनेकदा पडत असतात. अमेरिका आणि चीन यांच्यातले हे व्यापारयुद्ध कधी सुरू झाले आणि त्याचे जगावर नेमके काय परिणाम झाले आहेत, हे माहीत करून घेण्याबरोबरच, भारत या संधीचा कसा फायदा घेऊ शकेल, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

व्यापारयुद्धाची सुरुवात
जानेवारी २०१८मध्ये अमेरिकेने सर्वप्रथम चिनी मालावर आयातकर आकारण्यास सुरुवात केली. अमेरिकेने जुलै २०१८मध्ये ३४ अब्ज डॉलर मूल्याच्या मालावर पुन्हा एकदा आणखी २५ टक्के आयातकर लादला. अमेरिकेच्या या कृत्याचे प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकी मालावर आयातकर आकारण्यास सुरुवात केली. ऑगस्ट २०१८मध्ये अमेरिकेने १६ अब्ज डॉलर मूल्याच्या मालावर कर आकारला आणि सप्टेंबरमध्ये २०० अब्ज डॉलर इतक्या मूल्याच्या चिनी वस्तूंवर जास्तीचा आयातकर ठोठावला. सोप्या शब्दांत सांगायचे तर, चीनबरोबरची व्यापारी तूट भरून काढण्यासाठी अमेरिकेने असे केले. परंतु, त्याचे परिणाम मात्र लगेचच दिसून आले. अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला. पर्यायाने, जगभरातील शेअर बाजारांवरही याचे पडसाद उमटले. या घटनेचा परिणाम भारतातील शेअर बाजारांवर फारसा होणार नाही, असे तेव्हा अर्थतज्ज्ञांनी म्हटले होते आणि तसेच घडले. भारतातले शेअर बाजार, सेन्सेक्स थोडेफार खाली आले. परंतु त्यांच्यावर कोणताही मोठा फरक झाल्याचे आढळून आले नाही; मात्र अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापारयुद्धाने भारतासाठी एक नवीन क्षितिज निर्माण केले आहे.



भारतासाठी सुवर्णसंधी
व्यापारयुद्धाच्या आधीच्या काळात भारत अमेरिकेला फारशा वस्तू निर्यात करू शकत नव्हता. वित्तीय तूट, रुपया-डॉलरमधील फरक यांसारख्या आर्थिक कारणांमुळे निर्यात करणे परवडत नव्हते. व्यापारयुद्धाने हे चित्र बरेच बदलू शकते. अमेरिकी बाजारपेठ व चिनी बाजारपेठ यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. ही तफावत भारताला भरून काढता येऊ शकते. अमेरिकेने चिनी मालावरील आयातकर टप्प्याटप्प्याने वाढवून जवळजवळ १५० टक्क्यांवर नेल्याने चिनी वस्तूंची आयात करण्याची शक्यता धूसर झाली आहे. याचा फायदा भारताला नक्कीच होऊ शकतो.

फ्लु क्युअर्ड टोबॅको आणि फ्रेश ग्रेप केमिकल्स ही उत्पादने आत्ता चीन मोठ्या प्रमाणात अमेरिकेला निर्यात करत आहे. भारतातही ही उत्पादने तयार होतात. भारताने निर्यातयोग्य दर्जा राखला आणि मनापासून या बाबतीत प्रयत्न केले तर चीनची जागा घेणे अशक्य नाही. आणखी एक फायदा म्हणजे, आशिया पॅसिफिक करारानुसार भारताला आयातकरावर उत्पादनानुसार सहा ते ३५ टक्के इतकी सवलत मिळू शकते. वस्त्रोद्योग, जेम्स व ज्वेलरी, पॅकिंगचे साहित्य अशा कन्झ्युमर गुड्समध्ये भारताला मोठी संधी आहे. २०१९च्या पूर्वार्धात फक्त आणि फक्त व्यापारयुद्धामुळे ७५५ दशलक्ष डॉलरची अतिरिक्त निर्यात करण्याची संधी भारताला मिळाली. त्यामध्ये कन्झ्युमर गुड्सशिवाय रसायने, धातू यांचा समावेश होता. 



२००५मध्ये चीनने अमेरिकेला शेतीमालाची जितकी निर्यात केली होती, त्यापेक्षा ८५ टक्के अधिक निर्यात २०१८ मध्ये केली. आकडेवारीनुसार, ६४.८३ अब्ज डॉलर इतक्या किमतीचा शेतीमाल अमेरिकेने २०१९च्या पूर्वार्धात चीनकडून आयात केला. तर्कशुद्ध विचार करता, भारत हा शेतीप्रधान देश असल्याचे वर्षानुवर्षे म्हटले जाते. आज भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. अमेरिकेसारखी मोठी व फायदेशीर बाजारपेठ उत्सुक असेल तर भारतीय शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच सुवर्णसंधी आहे.

चीनला निर्यात
चीन आज जगभर निर्यात करत असला, तरी काही प्रमाणात शेतीमाल या देशाला अमेरिकेकडून व भारताकडून आयात करावा लागतो. २०१९च्या आकडेवारीनुसार, दर वर्षी चीन तीन लाख कोटी टन सोयाबीन अमेरिकेकडून आयात करतो. व्यापारयुद्धामुळे सोयाबीनची आयात नक्कीच महाग झाली आहे. त्यामुळे तोफूसारखे सोयाबीन वापरून तयार केले जाणारे पदार्थ बनवणारे कारखानदार नक्कीच अमेरिकेला तोडीस तोड पर्याय शोधत आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकवले जाते. गुणवत्ता चांगली असल्याने भारत हे सोयाबीन निश्चितपणे निर्यात करू शकतो. मध्य प्रदेश सरकारने या बाबतीत प्रयत्नही सुरू केले आहेत.

मांसाहारासाठी पर्याय
जगातील सर्वाधिक मांसाहार करणाऱ्या देशांमध्ये चीनचाही समावेश होतो. वाढती लोकसंख्या आणि मांस व्यवसायातील वाढते दर विचारात घेता, चीनमधील मांस आयातदार स्वस्त दरात मिळणाऱ्या मांसाचे पर्याय नेहमी शोधत असतात. भारतात बीफवर बंदी असली, तरी खूप आधीपासून भारत चीनला बीफ निर्यात करतो. चीन काही अंशी अमेरिकेकडूनही बीफ आयात करतो. व्यापारयुद्धामुळे साहजिकच भाव वाढले असल्याने अमेरिकेकडून आयात होणारे बीफ हे महाग आहे आणि भारत आकारत असलेले दर तुलनेने कमी आहेत. 

मत्स्योत्पादने
चीनमध्ये मासे आणि माशांशी संबंधित पदार्थ खाणाऱ्यांचे प्रमाणही कमी नाही. त्यासाठी चीनची भिस्त अमेरिकवरच अधिक आहे. व्यापारयुद्धामुळे हे पदार्थही महागले असल्याने अमेरिकेपेक्षा स्वस्त पर्याय मिळाला तर चीनला हवाच आहे. भौगोलिक स्थान विचारात घेता चीनला भारतातून मत्स्योत्पादने आयात करणे केव्हाही स्वस्त पडू शकते. 

अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय दर्जा साध्य करून, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून निर्यातीमध्ये चांगलीच वाढ करू शकतो. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धामध्ये भारतासाठी निश्चितच संधी दडलेल्या आहेत. 

- सोहम काकडे
ई-मेल : soham.kakade@ewan.co.in

(लेखक पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि चिनी भाषेचे तज्ज्ञ आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EXCPCQ
Similar Posts
भारतात चीनची गुंतवणूक आहे तरी किती? चीनवर बहिष्कार हा जिव्हाळ्याचा विषय झाला आणि सामान्य नागरिक भावनेच्या भरत वाहवत गेला. आणि त्याने सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. चीनवर बंदी कधी आणणार? चिनी मालावर बंदी कधी घालणार? पण वस्तुस्थिती काय आहे? चीनची भारतातील गुंतवणूक कशी आणि किती आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहू या ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या चौथ्या भागात
भारत-चीन संबंध : भावनिक नको, ‘प्रॅक्टिकल’ दृष्टिकोन हवा ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा २०वा म्हणजेच अंतिम भाग.....
चीनचा नवा विस्तारवाद – वन बेल्ट वन रोड शी जिनपिंग नोव्हेंबर २०१२मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि लगेचच मार्च २०१३मध्ये ते चीनचे अध्यक्ष झाले. चीन आधीपासूनच पाहत असलेले विस्तारवादाचे स्वप्न जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर आणखी गडद झाले. त्याबरोबरच, आणखी महत्त्वाकांक्षी स्वप्ने व भौतिक विस्तारवाद साकारण्याचीही तयारी सुरू झाली. ही तयारी
करोनानंतरचा चीन जिथून करोना विषाणूचा प्रसार जगभर झाला, त्या विषाणूचा देशांतर्गत प्रसार रोखण्यासाठी चीनने नेमके काय केले, आत्ता चीनमधील परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा वेध ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या आजच्या दुसऱ्या भागात घेण्यात आला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language