Ad will apear here
Next
२५० महिलांनी घेतला कर्करोग तपासणी शिबिराचा लाभ

कोपरगाव : स्तनाचा कर्करोग जागरूकता महिन्यानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्करोग तपासणी आणि जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५० महिला, मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला. 
   
महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये स्तन कर्करोगासह, मुख कर्करोग आणि गर्भाशयातील कर्करोगाची तपासणी करण्यात आली. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. शिल्पी डोळस, तृप्ती ठाणेकर, शुभदा क्रूझ, मेधा नाटेकर, श्रीहरी शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZVDCF
Similar Posts
‘सूर्यदत्ता’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पुणे : ‘आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो
तिच्या जिद्दीपुढे मृत्यूही हरला पुणे : सध्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे लढा देत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले जात आहे. तशीच जिद्द दाखवून सोलापूरच्या पन्नास वर्षीय महिलेने ‘ग्लिओब्लास्टोमा’ या दुर्मीळ प्रकारच्या कर्करोगाला हरवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये पाच वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत
रुबी हॉल क्लिनिकमध्ये महिला दिन साजरा पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लॅबोरेटरी आणि क्वालिटी विभागाच्या संचालिका नीता मुन्शी, कमलनयन बजाज कॅन्सर सेंटरच्या प्रशासन प्रमुख शुभदा क्रुझ आणि रूबी हॉल क्लिनिकमधील सामाजिक कार्यविभागाच्या प्रमुख सुरेखा जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र पुणे : ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने दगडूशेठ गणपतीजवळ वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून, येथे भाविकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language