Ad will apear here
Next
प्रोग्रामिंग इन ‘सी’
‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...
..............

आपण बघतो, की काही वेळा अभ्यासाच्या काही काही पुस्तकांचा आवाकाच धडकी भरवणारा असतो. ‘आपल्याला ते पुस्तक झेपेल की नाही’ असा विचार काही पुस्तकांचं जाडजूड आणि भारदस्त रूप बघून आपल्या मनात येऊ शकतो. त्याला उत्तर म्हणजे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं ‘प्रोग्रामिंग इन सी’ हे ३४२ पानांचं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक!

‘व्हीजेटीआय’सारख्या अग्रगण्य इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख आणि त्या विषयाचे प्रोफेसर म्हणून काम केलेले महेश भावे आणि ‘विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्रिन्सिपॉल सुनील पाटेकर या दोन कम्प्युटर क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी त्यांच्या अनुभवांचा पूर्ण उपयोग करून हे पुस्तक विद्यार्थ्यांसमोर आणलं आहे.

या पुस्तकाचं वेगळेपण अनेक प्रकारे सांगता येईल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पारंपारिक टेक्स्ट बुक्समध्ये बहुधा थिअरीवर भर असतो. बहुतेक प्रकरणं सांगोपांग थिअरीनं ओतप्रोत भरलेली असतात. क्वचित कुठे एखादी रचना, किंवा उदाहरण मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ दिलेलं असतं; पण हे पुस्तक त्या बाबतीत नि:संशय वेगळं ठरेल. कारण या पुस्तकाच्या लेखकद्वयीच्या आजपर्यंतच्या अनुभवांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात येणारे प्रश्न आणि शंका हेरून, त्यांनी पुस्तकाची रचना ‘प्रश्न आणि उत्तर’ अशाच स्वरूपाची केली आहे. त्यामुळे वाचणाऱ्या प्रत्येकालाच जणू आपल्याच मनातल्या शंकेचं तिथल्या तिथे निरसन होतंय हा फील येतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘अल्गोरिदम्स’चा वापर. यामुळे हे पुस्तक वाचणारा भले इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असो वा सायन्स, किंवा कॉमर्सचा ...त्यालाही प्रोग्रामिंग आकळायला त्याची मदत होते.

कुठलाही विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचं विवेचन ऐकल्यावर त्याची उजळणी होणं गरजेचं असतं. या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्या प्रकरणात आपण काय शिकलो हे ‘बुलेट पॉइंट’सह दिल्याने उजळणी तर होतेच, याशिवाय ते प्रकरण स्मरणात पक्कं राहण्यासाठी मदत होते. आणि तो विषय नक्की नीट समजलाय की नाही हे ताडून बघण्यासाठी काही एक्सरसाइझही सोडवण्याकरिता देण्यात आले आहेत.

बरेचसे प्रश्न आजच्या जगातल्या दैनंदिन बाबींचा विचार करून तयार केले आहेत. तसंच आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून ‘बीट मॅनिप्युलेशन’वर एक स्वतंत्र प्रकरण दिलं आहे. 
      
बऱ्याच विद्यापीठांच्या परीक्षेत काही ठराविक पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर या पुस्तकात असे बहुतेक प्रश्न प्रकरण संपताना ‘एंड ऑफ चाप्टर प्रोग्राम्स’ अशा शीर्षकांतर्गत दिले आहेत. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. काही काही टेक्स्ट बुक्समध्ये क्वचित असं होतं, की एखाद्या प्रकरणात असे उल्लेख येतात की ज्याचा उलगडा बऱ्याच पुढे वाचत गेल्यावर खूप पुढच्या प्रकरणात होऊ शकतो आणि अशा वेळी नवशिक्या किंवा नवख्या मुलांची पंचाईत होते. त्यामुळे या पुस्तकाची रचना प्रवाही पद्धतीने पुढे वाचत जाणं सुकर होईल अशीच करण्यात आली आहे. काही मंडळी हे पुस्तक बैठक मारून संपवतील, तर काही जण सावकाश एकेक प्रकरण वाचत. एक नक्की, की हे पुस्तक हातात घेणाऱ्यांना ‘व्हॅल्यू फॉर मनी’ची खात्री.

www.mpbhave.com या आपल्या वेबसाइटवरून आणखीही पूरक उदाहरणं आणि प्रश्नावली विद्यार्थ्यांसाठी देण्याचीही योजना असल्याचं लेखकद्वयीने जाहीर केलं आहे.

‘सी प्रोग्रामिंग’ क्षेत्रात अगदी नवशिक्या असणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते या क्षेत्रात प्रावीण्य असणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरेल, याची खात्री असल्यानं या पुस्तकाचं नावही ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ असंच ठेवण्यात आलंय आणि ते सार्थ आहे यात शंका नाही!  

पुस्तक : ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’
लेखक : महेश भावे, सुनील पाटेकर
प्रकाशन : इंटरनॅशनल बुक हाउस प्रायव्हेट लिमिटेड
पाने : ३४२
मूल्य : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे.)

(हा पुस्तक परिचय इंग्लिश भाषेत वाचण्यासाठी इथं क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZGYBE
Similar Posts
अंतरंग युवा मनाचे एकीकडे शिक्षण आणि नोकरीचं व्यस्त गणित असताना रोजच्या आयुष्यात युवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या म्हणजे ‘जनरेशन गॅप’मुळे उद्भवणारे कलह, प्रेमप्रकरणं आणि त्यातून प्रसंगी वाट्याला येणारं नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे नात्यांमध्ये येत चाललेला दुरावा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या
परिवर्तन तुमच्याच हाती... देशातील परिस्थितीत परिवर्तन कसे घडायला हवे आणि आपण नागरिक ते कसे घडवून आणू शकतो, हा विचार इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकातून मांडला आहे. त्या पुस्तकाविषयी...
आमंत्रण स्वर्गाचे मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ‘स्वतःमधली अ-प्रगल्भता, अहंकार आणि अज्ञान झटकून टाकून आध्यात्मिकतेच्या वाटेवर चालायला सुरुवात केली, की आत्माविष्कार साध्य होईल आणि तोच आपल्याला स्वर्गाची वाट दाखवेल’ असे ठाम प्रतिपादन करणारे ‘आमंत्रण स्वर्गाचे’ हे पुस्तक लेखक विशाल चिप्कर यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय
सहकारी बँकांचा सीईओ - एक आर्य चाणक्य भारताच्या इतिहासात आर्य चाणक्याचं स्थान मोठं आणि योगदान अभूतपूर्व! त्यानं आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि त्याच्या विलक्षण नीतिनियमांनुसार मौर्य साम्राज्याचा भारतभर विस्तार केला आणि म्हणून त्याची नीतिसूत्रं ‘चाणक्यनीती’ म्हणून प्रसिद्ध झाली. किरण कर्नाड यांना चाणक्याची नीती आणि गुण अंगी असणारा सहकारी बँकांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language