Ad will apear here
Next
स्मार्ट ग्रंथालय संकल्पना राबवायला हवी


ज्येष्ठ साहित्यिक मनोहर : पुणे मराठी ग्रंथालयाचा वर्धापनदिन

पुणे- वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रत्येक गावात रुग्णालयाप्रमाणे ग्रंथालय असणे गरजेचे आहे. ग्रंथालये केवळ असून चालणार नाहीत तर ती प्रसन्नही असली पाहिजे. त्यामुळे आता स्मार्ट शहराच्या संकल्पनेबरोबरच स्मार्ट ग्रंथालय ही संकल्पना देखील राबवायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्‍याम मनोहर यांनी व्यक्त केले.

पुणे मराठी ग्रंथालयाचा 104 व्या वर्धापनदिनानिमित्त साहित्यसम्राट न.चिं.केळकर पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ल.म.कडू, श्‍याम मनोहर, अश्‍लेषा महाजन आणि ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते श्‍याम जोशी यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड होत्या. डॉ. सुरेश पळसोदकर, हेमंत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

मनोहर म्हणाले, वाचनासाठी जाणून घेण्याची वृत्ती असायला हवी. एकदा वाचले की ते लक्षातच राहिले पाहिजे, अशी अट नसावी. कारण ते ज्ञान आहे आणि ते सहजासहजी मिळत नाही. तसेच त्यातून भाषेचा आनंदही घेता आला पाहिजे.

डॉ.वाड म्हणाल्या, मराठी लोक ही वाचनाची भूकेली आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचवा, त्यांना वाचून दाखवा. तसेच वाचनाच्या प्रचार व प्रसारासाठी जास्तीत जास्त पुस्तकांचे डिजीटलायजेशन व्हायला हवे.

जोशी म्हणाले, एखाद्या वाचकाला ग्रंथालयात एखादे पुस्तक मिळाले नाही तर कोठे मिळेल याची माहिती उपलब्ध नसते. यावर उपाय म्हणून ग्रथालयांचे महामंडळ तयार करणे गरजेचे आहे. ज्यामुळे पुण्यातील सर्व ग्रथालयांची एकत्रित जुळणी करता येईल. अगामी काळात मराठी स्वायत्त विद्यापीठाच्यावतीने पुण्यातील सर्व ग्रंथालयातील पुस्तकांची बृहत सुची तयार करण्यात येणार आहे. यावेळी ल.म.कडू, अश्‍लेषा महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद घाणेकर यांनी केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BYZGAJ
Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language