शेफ विष्णू मनोहर हे आता मराठी कुटुंबात सर्वांनीच परिचित आहेत. विविध पाककृतींवरील त्यांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत. यातील पाच पुस्तकांचा संच ‘विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य’मधून वाचकांच्या भेटीस आला आहे. यातील ‘लज्जतदार मेजवानी’ या पुस्तकात ‘ग्रेव्ही’ किंवा ‘करी’ करून त्यात वेगवेगळ्या भाज्या घालून केलेल्या पदार्थांच्या कृती आहेत. प्रथिने, जीवनसत्त्वे कसे मिळतात हेही सांगितले आहे.
‘विष्णुजीका किचन फंडा’मधून अॅरोगानो म्हणजे काय, क्रिम ऑफ टारटर म्हणजे काय अशा असंख्य प्रश्नाची उत्तरे मिळतात. स्वयंपाकास उपयुक्त व आयुर्वेदिक टिप्स, भाज्यांचे व फळांचे गुणधर्म, स्वयंपाकघरातील स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले आहे. ‘खाद्याविष्कार’मधून आंबा, फळे, भाज्या धान्य आदी ४९ घटकांपासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत.
‘भारतीय खाद्यसंस्कृती दक्षिण भारत’ आणि ‘भारतीय खाद्यसंस्कृती उत्तर भारत’मधून त्या-त्या राज्यांमधील विविध प्रांतातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ कसे करायचे ते सांगितले आहे. यात शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचाही समावेश आहे.
पुस्तक : विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य
लेखक : विष्णू मनोहर
प्रकाशक : राजा प्रकाशन
पाने : ७२८
किंमत : ६७५ रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)