Ad will apear here
Next
करुणा चिमणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
श्रीमती करुणा चिमणकर यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर

नागपूर : येथील सामाजिक कार्यकर्त्या  डी. बी. एस. एस. सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा, बचतगट महिला महासंघाच्या अध्यक्षा व दि विदर्भ प्रीमियर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी च्या संचालिका श्रीमती करुणा चिमणकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार - २०१७ देण्यात आला आहे. 

कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह व नगदी पुरस्कार देऊन करुणा चिमणकर यांचा गौरव करण्यात आला. दिन-दुबळे-दलित, शोषित यांच्या विकासासाठी प्रयत्न केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी दिलीप कांबळे, राज्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, दिनेश वाघमारे हे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत आमदार विकास कुंभारे, आमदार नामो माणार, माजी महापौर प्रवीण दटके, महाल झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेविका स्नेहा वाघमारे, नगरसेवक बंटी शेळके, रत्नमाला मेश्राम, ममता गेडाम, राजु कोसे, निलेश खैर, शालिनी सक्सेना, अभय बावणे, विजय धाबर्डे, सोनु देशपांडे, राजेश भालेराव, संजय घाटोळे, सुजाता वासनिक, अनिता बागडे यांनी करुणा चिमणकर यांचे अभिनंदन केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZCGBD
Similar Posts
‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’ मुंबई : राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षांतील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,
नागपुरात उद्यापासून अभिनय कार्यशाळा नागपूर : राष्ट्रभाषा परिवार व मेराकी थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसांच्या अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, २५ मेपासून आठ जूनपर्यंत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शहरातील युवकांना नाट्य क्षेत्रातील विविध पैलूंची ओळख करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिनय कार्यशाळेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत
‘खेळाडूंनी स्वत:च्या गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे’ गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत दर वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडापूरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्ह्यात विभागीय क्रीडा संमेलन झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language