Ad will apear here
Next
मन कोणत्याही विकारावर मात करू शकते : पर्रीकर

पणजी : ‘मानवी मन कोणत्याही विकारावर मात करू शकते....’ हे विचार आहेत देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे. गेल्या वर्षीपासून कर्करोगाने आजारी असलेल्या पर्रीकरांनी अलीकडेच आपल्या कामाला पुन्हा जोमाने सुरुवात केली असून, गोव्याचा अर्थसंकल्पही त्यांनी नुकताच सादर केला. त्यामुळेच स्वतःच्या अनुभवातून त्यांनी जागतिक कर्करोग दिनी (चार फेब्रुवारी) केलेले हे प्रेरक ट्विट नागरिकांना प्रचंड भावले आहे. २४ तासांच्या आत ४० हजारांहून अधिक जणांनी ते लाइक केले असून, नऊ हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे.


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (६३) यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने फेब्रुवारी २०१८पासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई, दिल्ली, तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने काही काळ ते कामापासून दूर होते; १४ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांना नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर त्यांनी घरातूनच कामाला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी त्यांचे एका बैठकीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. तसेच २०१९च्या सुरुवातीलाच मांडवी नदीवरील पुलाचे उद्घाटन करण्यासाठी ते उपस्थित राहिले होते. नाकात नळ्या घातलेल्या स्थितीतही कामाला सुरुवात करून त्यांनी आपण कर्करोगाचा बाऊ न करता सक्षमपणे त्याच्याशी लढणार असल्याचे इरादे स्पष्ट केले होते.


त्यानंतर ३० जानेवारी रोजी त्यांनी गोव्याचा अर्थसंकल्पही सादर केला. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर झालेल्या एका टीकेचा समाचार त्यांनी त्या वेळी केलेल्या भाषणात घेतला. ‘माझ्यात अजूनही जोश आहे आणि मी पूर्णपणे शुद्धीत (होश) आहे,’ असे ते म्हणाले होते. ‘आज मी पुन्हा एकदा वचन देतो, की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी गोव्याची निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन सेवा करीन,’ असे उद्गार त्यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणादरम्यान काढले होते.


या दोन्ही प्रसंगांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कृतीतून जे काही दिसले, त्याचीच उक्ती त्यांनी ट्विट केल्यामुळे ते नागरिकांना अधिक भावले. त्यांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि ट्विट अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, यात शंका नाही.


दरम्यान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीदेखील कर्करोगाशी लढाई सुरू असतानाच पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


(सोनाली बेंद्रेने पुन्हा कामावर रुजू होताना व्यक्त केलेल्या भावना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.) 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZXKBX
 विकारांवर मात करणारं मन बाळगणार्‍या शरीरावर अखेर कर्करोगानं मात केली. पण त्याला इलाज नाही. मानव मर्त्य असला, तरी त्याचा विचार अमर असतो. असा अमर्त्य विचारांचा ठेवा देणार्‍या पर्रीकरांना विनम्र
श्रद्धांजली!
Similar Posts
असामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस! मनोहर पर्रीकर यांचं वागणं-बोलणं अगदी तुमच्या-आमच्यासारखं, म्हणजे सामान्य माणसासारखं असलं, तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व असामान्य होतं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं राहता येत नाही. तरीही मनोहर पर्रीकरांच्या वेळी तो नियम बदलून त्यांना निवडणुकीला उभं करण्यात आलं आणि ते निवडूनही आले
राजकारणापलीकडचे पर्रीकर आज (१७ मार्च) मनोहर पर्रीकर यांचा स्मृतिदिन. मनस्विनी प्रभुणे-नायक यांनी अनुभवलेल्या ‘राजकारणापलीकडच्या पर्रीकरां’बद्दलचा लेख दोन वर्षांपूर्वी लिहिला होता. तो या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.
देशातील प्रत्येक विमानतळावर सुरू होणार ‘जीआय स्टोअर’ पणजी : ‘भौगोलिक निर्देशन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) मिळालेल्या म्हणजेच संबंधित स्थानिक भागाचे वैशिष्ट्य असलेल्या हस्तकलेच्या वस्तू, तसेच कृषी उत्पादने यांची विक्री करणारी जीआय स्टोअर्स देशातील प्रत्येक विमानतळावर सुरू केली जाणार आहेत. स्थानिक उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय
प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी ते गोवा सायकलवारी; १० जणांची ‘कोकण भरारी’ रत्नागिरी : रत्नागिरी ते गोवा हे ३१२ किलोमीटरचे अंतर तीन दिवसांत सायकलने यशस्वीरीत्या पार करून रत्नागिरीतील १० सायकलपटूंनी प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश सर्वांना दिला. वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकलची ‘कोकण भरारी’ मोहीम नुकतीच पार पडली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language