Ad will apear here
Next
विंदांची ‘पिशी मावशी’ कविता आणि मतकरींची कथा : अभिवाचन - तनुजा रहाणे

पिशी मावशी आणि तिची भुतावळ’ हा कवी विंदा करंदीकरांचा गाजलेला कवितासंग्रह. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तनुजा रहाणे यांनी त्या कवितासंग्रहातील एक कविता, तसेच रत्नाकर मतकरी यांची ‘ऐक, टोले पडताहेत’ ही कथा सादर केली आहे....
.........
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई
स्मशानामध्ये घालते फेरी
पहाटेपूर्वी करते न्हेरी
न्हेरीसाठी होतात चट्टर
दोन पोरे लठ्ठत मठ्ठे
पण प्रत्येक एकादशीस
रताळ्याचा खाते कीस.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपोआप खोले!
आला आला महासमंध;
त्याची चाल संथ संथ
त्याची उंची दहा फूट
अंगावरती काळा सूट,
डोक्यावरती हॅट बीट,
तुम्ही फसाल! पहा नीट
वळवळणारे गळ्यात काय?
नागोबाचा लंबा टाय!
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपोआप खोले!
आले आले थातूमातू ;
हे खाते रोज सातू
जर सातू नसले घरात 
तर बसते नखे खात.
रोज रात्री मांजरावरुन 
हे येते जग फिरुन,
हे भूत आहे मुत्रे,
तरी त्याला भितात कुत्रे.
किर्र रानी सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्यांचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आले आले अरेतुरे;
हे भूत काळेबेरे
मध्य रात्री रांगत येते;
दारावरती थाप देते.
जर त्याला घेतले घरात
जीभ काढते तेरा हात.
पण कारे म्हटले तर,
जाईल सोडून तुमचे घर.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आला आला आग्या वेताळ;
त्याच्या डोक्यात असतो जाळ.
कोळसे खातो कराकर;
राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरून
भुते घेतात स्वैपाक करून
केसामधून उठतात ज्वाळा,
सगळे न्हावी भितात त्याला.
किर्र रात्री सुन्न रानी;
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आला आला पिंपळावरून
एक मुंजा संध्या करून.
त्याची पोथी चालत येते;
हळूच त्याच्या हातात जाते.
रक्तातसारखी पाने लाल,
खुणेसाठी असते पाल.
तीच पोथी ऐकण्यासाठी
भुते आली; झाली दाटी
पाल लागली चुकचुक करू,
पोथीवाचन झाले सुरू;

हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड
फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
सर्व आले सर्व आले
दार हसले बंद झाले!

- विंदा करंदीकर

(‘बुकगंगा डॉट कॉम’वरून ‘विंदां’ची पुस्तकं मागविण्यासाठी https://goo.gl/ytZe6f येथे, तर रत्नाकर मतकरींची पुस्तकं मागविण्यासाठी https://goo.gl/THknnb येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZYCBM
Similar Posts
रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेचे अभिवाचन : ‘ऐक.. टोले पडताहेत’ ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या गूढकथा हा कायमच रसिकांच्या आवडीचा विषय होता.. ‘ऐक.. टोले पडताहेत’ या त्यांच्या कथासंग्रहातील त्याच शीर्षकाच्या कथेच्या, तनुजा रहाणे यांनी केलेल्या अभिवाचनाचा व्हिडिओ शेअर करत आहोत... ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातून..
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश
सब घोडे बारा टक्के! - अभिवाचन : वैभव मांगले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे अभिनेते वैभव मांगले यांनी... व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन - स्वाती महाळंक त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language