Ad will apear here
Next
स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली देणारं पुस्तक
प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ हेरक्लायटसने म्हटलं होतं, ‘देअर इज नथिंग पर्मनन्ट एक्सेप्ट चेंज.’ बदल हाच काय तो शाश्वत असतो! आपल्याला संपूर्णत्वाकडे, विकासाकडे वाटचाल करायची असेल, तर आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवायला हवा आणि त्यासाठी लागणाऱ्या स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली विनोद बिडवाईक यांनी आपल्या ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ या आकर्षक पुस्तकातून आपल्यासमोर ठेवली आहे. तरुणाईला भावेल अशीच भाषा आणि उदाहरणं दिल्यानं पुस्तक सर्वांना आवडेल हे निश्चित!....
.........
नावाजलेल्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मनुष्यबळ क्षेत्रात विविध पदांवर काम केलेल्या विनोद बिडवाईक यांनी ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ हे पुस्तक लिहिले आहे. आपल्या अनुभवाचा पूर्ण उपयोग आजच्या तरुणाईला व्हावा या हेतूने अत्यंत समर्पक अशी थोरामोठ्यांची सुभाषितवजा वाक्यं (Quotes) वापरून त्यांनी प्रत्येक प्रकरणाची सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरण वाचण्याआधी वाचकाची त्या प्रकरणाकडे बघण्याची एक मानसिक बैठक नकळत तयार होत जाते. त्याचबरोबर कुणालाही समजायला सोपी अशी भाषा आणि तरुणाईला भावतील अशी आजच्या काळातली उदाहरणं हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.

सगळी मिळून एकूण ३५ प्रकरणं, पण त्यांची नावंसुद्धा इतकी लक्षवेधी आहेत, की हवा तो संदेश तिथूनच मनात घुसावा! उदाहरणार्थ - ‘मनाची तयारी हवी,’ ‘फर्स्ट इम्प्रेशन’, ‘स्वप्न बघा स्वप्न’, ‘लेबल्स फेकून द्या’, ‘रोल मॉडेल’, ‘कॉमन सेन्स’, ‘चॉईसचं स्वातंत्र्य’, ‘झपाटलेपण’, ‘प्रेझेंटेशनचं कौशल्य’... नावापासूनच प्रकरणाबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि आपण गुंतत जातो त्या विचारांत...!

‘जगात कसे वागावे’ किंवा ‘स्वतःला कसे सुधारावे’ टाइपची जी पुस्तकं असतात, ती बहुधा बोजड असतात आणि त्यात पांडित्यपूर्ण विचारांचा मारा असतो; पण बिडवाईक यांच्या या पुस्तकात मात्र प्रत्येक प्रकरणामध्ये तरुणाईला भावतील अशी आजच्या काळातली उदाहरणं दिल्यामुळे वाचक ‘अरे, हे तर माझ्या मनातलं जणू..’ असे मनोमन उद्गार काढून बिडवाईकांनी मांडलेला विचार आपलासा करून टाकतो हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य. उदाहरणार्थ - ‘जीवनसागरातील पोहण्याचं शास्त्र’ या प्रकरणातलं पुस्तकी पांडित्य (थिअरी) आणि प्रत्यक्ष ज्ञान (प्रॅक्टिकल) यातल्या फरकाचं उदाहरण असो किंवा ‘इतिहासही शिक्षक’ या प्रकरणातल्या द्रोणाचार्यांवर बाजी उलटवणाऱ्या आधुनिक स्मार्ट आणि चलाख एकलव्याचं उदाहरण! ‘संप्रेरण कौशल्य’ प्रकरणात कम्युनिकेशन स्किल समजावून सांगताना दिलेलं शिंप्याचं उदाहरण असो किंवा मग ‘प्रेझेंटेशनचं कौशल्य’ या प्रकरणात सुंदर तरुणीला बघून तिच्याशी ओळख करून घ्यायला पुढे सरसावलेल्या तरुणाची तिनेच ‘विकेट’ काढल्याचा प्रसंग असो - अशी उदाहरणं देऊन बिडवाईक यांनी वाचकांना आपलंसं करून घेत आपले मुद्दे बरोबर त्यांच्या मनात घुसवले आहेत, हे त्यांच्या लेखनाचं कौशल्य.

आपल्याला व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या पुस्तकात दिलेले मूलमंत्र उपयोगी पडतील यात शंका नाही. अवश्य संग्रही ठेवावं, असं हे पुस्तक आहे!

स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे
लेखक : विनोद बिडवाईक
प्रकाशक : बोहो सोल पब्लिकेशन्स, माणिकमोती कॉम्प्लेक्स, पुणे-सातारा रोड, पुणे-४६
पृष्ठे : १३६
मूल्य : १९० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZQZBJ
Similar Posts
नियतीचे प्रतिबिंब हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास
झुंज श्वासाशी आजारी माणसाला उपचाराच्या शेवटच्या टप्प्यांत ऑक्सिजनची गरज भासते; पण ज्याचे हॉस्पिटलमधले प्राथमिक उपचारच ऑक्सिजन घेऊन सुरू होत असतील त्याच्या आयुष्याची शाश्वती किती कठीण? ज्याला वयाच्या १६व्या वर्षीच त्यापुढचा प्रत्येक दिवस ‘बोनस’ असणार आहे, हे कळलं असेल, त्याच्या मनाची घालमेल इतरांना कशी कळावी? मुकुल
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...
निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नांकडे अत्यंत वस्तुनिष्ठपणे पाहत, त्याविषयीचे आपले परखड विचार आणि मते ठोसपणे मांडणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या ३० वैचारिक लेखांचे ‘निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी’ असे वेगळ्या धाटणीचे शीर्षक असलेले पुस्तक अजय महाजन यांनी आपल्यासमोर आणले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language