Ad will apear here
Next
स्वामी विवेकानंद, विद्या बाळ, जॅक लंडन
‘दुसऱ्याचा तिरस्कार करू नका, त्याला मदतीचा हात देता येत असेल तर जरूर द्या; तेही जमत नसेल तर शांतपणे हाताची घडी घाला आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा..’ असं म्हणणारे स्वामी विवेकानंद, स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात संवेदनशील बनवण्याचं कार्य करणाऱ्या विद्या बाळ आणि अलास्कामधल्या सोन्याच्या शोधमोहिमांच्या पार्श्वभूमीवरची बक नावाच्या कुत्र्याची साहसकथा (कॉल ऑफ दी वाइल्ड) लिहून जगप्रसिद्ध झालेला जॅक लंडन यांचा १२ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी.....
.......

नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त 

१२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात जन्मलेल्या वीरेश्वर ऊर्फ नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त यांना अवघं जग ओळखतं ते विविदिशानंद आणि स्वामी विवेकानंद म्हणूनच!! आपले गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य असणारे स्वामी विवेकानंद हे अफाट आणि तल्लख स्मरणशक्ती लाभलेलं तेज:पुंज व्यक्तिमत्त्व होतं. 

‘मी कोण आहे? माझं खरं स्वरूप आणि जीवितकार्य काय आहे?’ अशांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधताशोधता त्यांना ‘खऱ्या’ स्वरूपाचा शोध लागला. त्यांची योगसाधना अद्वितीय अशीच होती.

‘अराइझ, अवेक अँड डू नॉट स्टॉप अनटिल दी गोल इज रीच्ड’सारखी त्यांची अनेक वचनं कायमच सर्व तरुणांना प्रेरणा देत राहिली आहेत. 

त्यांनी लिहिलेले Premyog, Bhaktiyog, Rajyog, Karmyog, Dnyanyog, Patanjali’s Yogsutra, A Journey to absolute, Vedant Philosophy  यांसारखे ग्रंथ लोकांना पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहिले आहेत. त्यांना हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने प्रभावित केलं होतं. पुढे त्यांनी स्पेन्सरच्या ‘Education’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. 

चार जुलै १९०२ रोजी बेलूरमध्ये त्यांचं निधन झालं. 
.....................
विद्या बाळ

१२ जानेवारी १९३७ रोजी जन्मलेल्या विद्या बाळ म्हणजे स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रमुख सामाजिक नेत्या आहेत. 

सुरुवातीला ‘स्त्री’ आणि नंतर ‘मिळून साऱ्याजणी’सारख्या मासिकांमधून सातत्याने लेख लिहून त्यांनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली आहे. 

निरनिराळ्या माध्यमांतून अत्यंत प्रभावीपणे आणि रोखठोक विचार मांडून त्यांनी न पटलेल्या रूढी-परंपरांविरुद्ध आवाज उठवला आहे. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या समोरच्या पुरुषांशी संवाद साधून आपली बाजू पटवण्याचा प्रयत्न करतात. स्त्री-मुक्ती चळवळीमधल्या खंद्या नेत्या म्हणून त्यांना आदराचं स्थान आहे. 

त्यांना फाय फाउंडेशन, आगरकर पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसंच सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव सन्मानसुद्धा मिळाला आहे. 
कथा गौरीची, अपराजितांचे नि:श्वास, शोध स्वतःचा, संवाद, तुमच्या-माझ्यासाठी, कमलाकी, तेजस्विनी, वाळवंटातील वाट अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

विद्या बाळ यांचं ३० जानेवारी २०२० रोजी निधन झालं.
.......
जॅक लंडन 

१२ जानेवारी १८७६ रोजी सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये जन्मलेला जॉन ग्रिफिथ चेनी हा ‘जॅक लंडन’ या टोपणनावाने कथाकार आणि कादंबरीकार म्हणून जगप्रसिद्ध झाला. 

जगण्यासाठी चार पैसे हवेत म्हणून त्याने लिखाणाकडे मोर्चा वळवला आणि चक्क आठवड्याचं एक वेळापत्रक तयार करून त्याप्रमाणे काव्य, विनोद, किस्से, साहसकथा, भयकथा असा रतीब घालायला सुरुवात केली आणि त्यातूनच त्याच्यामधला लेखक घडत गेला. पुढे १७ वर्षांत त्याने पन्नासेक पुस्तकं लिहिली. त्याच्या काळात तो अमेरिकेतला सर्वांत जास्त मानधन घेणारा लेखक बनला होता. 

१९०३ सालची ‘कॉल ऑफ दी वाइल्ड’ ही अलास्कामधल्या सोन्याच्या शोधमोहिमांच्या पार्श्वभूमीवरची बक नावाच्या कुत्र्याची साहसकथा ही त्याची मास्टरपीस कादंबरी मानली जाते. कॅलिफोर्नियामधल्या सुखासीन जगण्यातून बकला चोरण्यात येऊन, त्याची रवानगी कॅनडामध्ये एका मोहिमेवर केली जाते. तिथल्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात परिस्थितीशी झुंज देत चिवट होत जाणारा बक, स्लेड ओढण्याच्या कटकटीतून जॉन थॉर्न्टनमुळे सुटतो. आणि त्याच्याबरोबर राहून पुढे सुटून स्वतंत्र आयुष्य जगतो. थॉर्न्टनला मारणाऱ्याला ठार करून बदलाही घेतो आणि पुढे लांडग्यांच्या कळपात सामील होऊन रानात स्वतंत्र आयुष्य जगतो. ही कादंबरी जबरदस्त लोकप्रिय ठरली आणि त्यावर सिनेमेही बनले.

टू बिल्ड ए फायर, दी आयर्न हील, मार्टिन एडन, दी सी वूल्फ, व्हाइट फँग – अशी त्याची अनेक पुस्तकं गाजली. २२ नोव्हेंबर १९१६ रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला. 






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZRXCI
Similar Posts
लीलावती भागवत, कविता महाजन बालकुमार साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लीलावती भागवत, सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता महाजन, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक भालचंद्र बहिरट, गोव्याविषयी विशेष संशोधन करणारे अनंत प्रियोळकर आणि ‘गावगाडा’कार त्रिंबक आत्रे या साहित्यिकांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये या सर्वांचा अल्पपरिचय
नरेंद्र बोडके ‘समुद्राचा दुपट्टा सतत सळसळता, आपण पाठवतो पावसाच्या लिपीतले संदेश, खरं तर आपण नसतोच- सगळी असण्याची चलबिचल, आपल्या पलीकडे, आपण निरभ्र, शांततेहून पारदर्शी, मौनाइतके बोलके,’ असं मांडणारे कवी आणि पत्रकार नरेंद्र बोडके यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
पु. शि. रेगे, जेम्स बॉल्डविन, इसाबेल अजेंडे आपल्या कवितांमधून अत्यंत धीट भाषेत स्त्रीच्या विविध रूपांचं सहजसुंदर वर्णन करणारे पु. शि. रेगे, अमेरिकेतल्या हार्लममधल्या आफ्रिकन लोकांच्या वाट्याला येणाऱ्या जीवनाविषयी तळमळीने लिहिणारे जेम्स बॉल्डविन आणि जगातली सर्वांत लोकप्रिय स्पॅनिश लेखिका इसाबेल अजेंडे यांचा दोन ऑगस्ट हा जन्मदिवस.
जॉर्ज बर्नार्ड शॉ, ऑल्डस हक्स्ली, डॉ. मिलिंद जोशी एकीकडे २९ पूर्ण लांबीची नाटकं आणि २२ छोट्या प्रवेशांची नाटकं अशी भरघोस साहित्यनिर्मिती करताना, ‘पिग्मॅलिअन’ ह्या नाटकामुळे अजरामर झालेला महान आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या भविष्याचा वेध घेणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीमुळे गाजलेला ऑल्डस हक्स्ली या इंग्लिश लेखकांचा आणि ‘अनंत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language