Ad will apear here
Next
होण्या बरे- गोळ्या चूर्णे
निरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकविणे आपल्या हातात असते. यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे; पण तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते. कधी गंभीर आजार जडावतात. त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच. यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म, ती बनविण्याची पद्धत, औषधे वापरण्याचे प्रमाण याची माहिती प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘होण्या बरे- गोळ्या चूर्णे’मधून केली आहे.

स्वरस, कल्क, हिम, फांट, क्षीरपाक, पाक, लेप, औषधी तूप, पोटीस यांची माहिती देत औषधांची सूची, विविध चुर्णांची नावे दिली आहेत. एकेरी, मिश्र, गुटिका वटी, गोळ्या, सुवर्णयुक्त औषधे, तेले आदी प्रकरणांमध्ये त्यांतील घटकद्रव्ये, उपयुक्तता, ते घेण्याचे प्रमाण, घटकद्रव्यांचा उल्लेख व त्यावर टिप्पणी दिली आहे. संबंधित औषधांवरील संशोधनाची माहितीही दिली आहे.

पुस्तक : होण्या बरे- गोळ्या चूर्णे
लेखक : डॉ. पां. ह. कुलकर्णी
प्रकाशक : दीर्घायु इंटरनॅशनल
पाने : १४८
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZTABY
Similar Posts
देवमाळ देव आहे की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवमाळ’मधून ब्रह्मसूत्रे-वेदांतसूत्रे याचे विश्लेषण करताना देव या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे.
प्रश्नोत्तर रत्न मालिका (सचित्र) अद्वैताचा सिद्धांत मांडणाऱ्या आदि शंकराचार्य यांनी भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माची पुन:स्थापना केली. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे व काव्ये रचली आहेत. आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात प्रश्नोत्तर रत्नमालिकेची पद्य स्वरूपात रचना केली. प्रश्न आणि त्याची उत्तरे असे यातील श्लोक आहेत. याचे मराठी रूपांतर पां
कशी आहे प्रकृती? दोन व्यक्ती समोरासमोर आल्या की काय कसे काय, बरे आहे ना, अशी विचारपूस केली जाते. बरे आहे का? याचा अर्थ अनेकदा आरोग्याशी संबंधित असतो. निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी सदिच्छाही दिल्या जातात. आपली प्रकृती जाणून घेऊन त्याप्रमाणे आहारविहार ठेवणे, उपचारपद्धती आदींची माहिती डॉ. पा. ह. कुलकर्णी यांनी ‘कशी आहे प्रकृती’मधून दिली आहे
ज्ञानेश्वरी वाचताना श्रीकृष्णाने सांगितलेली गीता ही संस्कृतमधून होती. ती सामान्यांना कळावी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ती मराठीत आणली; पण गीतेचे फक्त भाषांतर नाही, तर कृष्णाला अर्जुनामार्फत सर्वांना काय सांगायचे आहे ते ‘ज्ञानेश्वरी’तून त्यांनी ओवी स्वरूपात सांगितले आहे. या ओव्या रचताना अनेक उदाहरणे, दृष्टांत, उपमा, अलंकार यांचा वापर केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language