पुणे : अॅटलास कॉप्कोने भारतात मार्क कॉम्प्रेसर्स दाखल केले आहेत. ते अॅटलास कॉप्कोच्या कॉम्प्रेसर टेक्निक व्यवसाय क्षेत्रात एक विभाग म्हणून काम करणार आहेत. मार्क ड्रायर व फिल्टर असलेल्या विश्वासार्ह कॉम्प्रेसरची पुरवठादार आहे. मार्क कॉम्प्रेसर्सना जगभरात ४० वर्षांहून अधिक अनुभव आहे व ते विश्वासार्हता, साधेपणा, सर्व्हिसची क्षमता व उपलब्धता यासाठी लोकप्रिय आहेत. मार्क कॉम्प्रेसरची स्थापना १९७०मध्ये इटलीतील ब्रेंडोला येथे करण्यात आली.
या युरोपीय ब्रँडअंतर्गतच्या उत्पादनांमध्ये ऑइल-इंजेक्टेड स्क्रू एअर कॉम्प्रेसर, कॉम्प्रेस्ड एअर अक्सेसरीज, तसेच विक्रीनंतर जागतिक दर्जाची सेवा यांचा समावेश आहे. कठीण व ट्रॉपिकल वातावरणीय स्थिती हाताळण्याची क्षमता असलेल्या एअर कॉम्प्रेसर्सचे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्यासाठी त्यांची विक्री चॅनल पार्टनर व वितरण जाळ्याद्वारे केली जाणार आहे.
अॅटलास कॉप्को (इंडिया) लि.चे जनरल मॅनेजर रमन कौल म्हणाले, ‘कॉम्प्रेसर्सच्या मार्क ब्रँडमुळे आम्ही कॉम्प्रेसर टेक्निक व्यवसाय क्षेत्रातील आघाडीचे स्थान अधिक सक्षम करू शकू, असा विश्वास आहे. मार्क उत्पादने विश्वासार्ह आहेत व उच्च उपलब्धता व सर्व्हिसची क्षमता यासाठी नावाजली जातात. मार्क उत्पादनांमुळे आम्ही लहान व मध्यम आकाराच्या कंपन्यांना विश्वासार्ह कॉम्प्रेस्ड एअर सोल्यूशन्स देतो.’
देशभर मार्कचे चॅनल पार्टनर आहेत आणि ते आगामी काळात आणखी विस्तार करणार आहेत. सध्या, मार्क कॉम्प्रेसर्सचे देशात २५हून अधिक चॅनल पार्टनर आहेत आणि या वर्षाअखेर हे जाळे सक्षम करण्याचे त्यांचे नियोजन आहे. एअर कॉम्प्रेसर क्षेत्रातील प्रसिद्ध नावांचा समावेश करून हे वितरण जाळे काळजीपूर्वक विस्तारले जात आहे.
अधिक माहितीसाठी : www.markcompressors.co.in