Ad will apear here
Next
वृक्ष संवर्धनासाठी वृक्षदत्तक योजना
प्रातिनिधिक फोटोभालीवली (पालघर): महाराष्ट्र शासनाच्या दोन कोटी वृक्षलागवडीच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ‘विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर’ संचालित ‘पर्यावरण विवेक समिती’द्वारे भालीवली येथे एफडीसीएमकडून एक हजार वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प केला गेला. 

त्यातील ५०० झाडे परवानगी घेऊन संस्थेच्या परिसरात (महामार्ग क्र. आठवर, खानीवडे टोलनाक्यापासून एक किलोमीटर आधी) वनविभागाच्या जमिनीवर लावण्यात आली व ५०० झाडे ‘विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर राष्ट्र सेवा समिती’च्या शाळेतील विद्यार्थांच्या घरी लावण्यात आली आहेत. 

‘पर्यावरण विवेक समिती’द्वारे या वृक्षांच्या संवर्धनाच्या व जनजागृती करण्याच्या उद्देशाने वृक्षदत्तक योजना राबवली जाते. वृक्ष दत्तक घेणाऱ्यांची नावे रोपांवर टॅग करण्याबरोबरच वेबसाइट्सवरही तीन वर्षांसाठी दिसतात. संस्थेतर्फे दत्तक वृक्षांचा सांभाळ करण्यासाठी एक विशेष व्यक्ती मासिक पगारावर नेमण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दर दोन-तीन महिन्यांतून गरजेप्रमाणे बाहेरून कामगार मागवून वृक्षांची काळजी घेतली जाते. 

प्रातिनिधिक फोटोपर्यावरण समितीद्वारे दर १५ दिवसांनी वृक्षांचे ऑडीट केले जाते व वृक्ष दत्तक घेणाऱ्या पालकाला त्या वृक्षांची वर्तमान स्थिती व्हॉटस अॅपद्वारे व ईमेलद्वारे कळविण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांमधून वृक्षांची उत्तम वाढ होण्यासाठी प्रयत्नशील विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात येते. 

पर्यावरण समितीमध्ये अनुभवी निवृत्त वनविभाग अधिकाऱ्यांचा व पर्यावरणप्रेमींचा समावेश आहे. 

पर्यावरण समिती प्रमुख : उमेश गुप्ता
संपर्क : ९३२२६ ९२७४३, ९४२२४ ९२७४३
अधिक माहितीसाठी : 
www.vivektreeplantation.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZKNBC
Similar Posts
पर्यावरण विवेक समितीचा वृक्षारोपण कार्यक्रम पालघर : विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर संचलित पर्यावरण विवेक समितीच्या वतीने भालीवली प्रकल्पालगत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी केलेल्या यशस्वी उपक्रमानंतर पुन्हा या वर्षीही महाराष्ट्र सरकारच्या चार कोटी वृक्षलागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
न्यूझीलंडच्या माइक बटलर यांची भारतात ‘दानयात्रा’ मुंबई : आदिवासी भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी न्यूझीलंडमधील ‘दानयात्रे’साठी प्रसिद्ध असणारे माइक बटलर यांनी तीन डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालवधीत मुंबई- पुणे- नाशिक-वाडा अशी ५७० किलोमीटरची दानयात्रा काढली असून, दादरमधील महापौर बंगल्यापासून, सोमवारी, तीन डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडे आठ वाजता
भैयासाहेब आंबेडकर यांना अभिवादन वाडा : भारतीय बौद्ध महासभा, वाडा तालुका यांच्या वतीने रमाईनगर नेहरोली (ता. वाडा, जि. पालघर) येथे सूर्यपुत्र यशवंतराव (भैयासाहेब) आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बौद्धाचार्य, उपासक, उपासिका व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सामूहिक सूत्रपठण आयोजित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
पुण्यात ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’ पुणे : जंगलात राहणारे आदिवासी, त्यांची जीवनशैली, खाद्यसंस्कृती याबद्दल जाणून घ्यायचे आहे, तर मग रविवारी, ३० सप्टेंबर रोजी ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’ या अनोख्या कार्यक्रमाला हजेरी लावा. पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यात काम करणाऱ्या ‘वयम्’ चळवळीने पुण्यात आदिवासी नृत्य, संगीत व खाद्यसंस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language