Ad will apear here
Next
अशा तुडविल्या काटेरी वाटा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीच्या जोखडातून मुक्त केलेला उपेक्षित समाज आज सन्मानाने जगतो आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात तो प्रगती करीत आहे. आर. के. जुमळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची कास धरली आणि खेड्यातील आयुष्य झिडकारून टाकले. हा सर्व प्रवास म्हणजे बाबासाहेबांचे ऋण आहे., असे मानीत त्यांनी ‘अशा तुडविल्या काटेरी वाटा’मधून अनुभव कथन केले आहे.

चौधरा गावात लेखकाचे बालपण गेले. दोन डोंगरांमध्ये वसलेल्या गावाचे सौंदर्य कथन करतानाच कुठलीही सोई-सुविधा नसलेल्या गावाच्या झालेल्या दुर्दशेचे वर्णनही यात आहे. जातीभेदाने दुभंगलेल्या गावातील समाज, चालीरीती, आई-वडील व भावंडांच्या आपुलकीचे घर, अशिक्षित आईची जागरूकता, घरातील हरहुन्नरी कलाकार, जातीभेदाने उद्ध्वस्त झालेली घरे, शिक्षांची ओढ, राजकारणामुळे भावाचे झालेले नुकसान, महाविद्यालयीन जीवन हे यातून उलगडले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपिकपदी नोकरी मिळेपर्यंतच्या आठवणी यात लेखकाने सांगितल्या आहेत.    

पुस्तक : अशा तुडविल्या काटेरी वाटा
लेखक : आर. के. जुमळे
प्रकाशक : स्वयंदीप प्रकाशन
पाने : २९४
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZMABV
Similar Posts
यसन ‘यसन’ म्हणजे बैलाच्या नाकात घातलेली दोरी. याचे नियंत्रण गाडीवानाकडे असते. अशा अनेक ‘यसनी’ माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असतात. यामुळे त्याचे जीवन कचाट्यात सापडते, असे कथन करीत ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी ‘यसन’ या कादंबरीतून ऊसतोडणी मजुरांचे ‘जीणं’ उभे केले आहे.
आयुष्याची गोळाबेरीज ‘आयुष्याची गोळाबेरीज’ हे ग. ना. केळकर यांचे पुस्तक दोन भागांत आहे. पहिल्या भागात त्यांचे आत्मचरित्र आहे. ते त्यांनी आयुष्यभर ठेवलेल्या अनेक नोंदीवर आधारित आहे. त्यांच्या आयुष्यात आलेले आश्चर्यकारक प्रसंग, योगायोगाने जुळून आलेल्या घटना, दैवी कृपेने टळलेले दुर्धर प्रसंग अशा सर्व हकिकतींचा प्रसंगानुरूप घेतलेला आढावा आहे
मार्गस्थ (भाग १) महानुभाव पंथातील प्रसिद्ध बा. भो. शास्त्री यांच्या आत्मचरित्राचा हा पहिला भाग आहे. महानुभाव पंथाच्या चाकोरीच्या आत आणि बाहेर त्यांनी मुक्त संचार केला. महानुभाव पंथ ते अक्षरशः जगले. साहजिकच पंथहिताच्या दृष्टीने जे योग्य आहे, ते सर्व या पुस्तकात आले आहे. मात्र, त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केला. आयुष्यातील
कथा एका अभाग्याची आयुष्यात प्रत्येकाची एक लढाईच सुरू असते. बहुतांश वेळा ही लढाई परिस्थितीशी असते. शामसुंदर महादेव नार्वेकर यांच्या या छोटेखानी आत्मचरित्रातील नायकही असाच परिस्थितीशी लढत राहातो. कधी जिंकतो, तर कधी हरतो. नार्वेकर यांचे हे आत्मपर लेखन आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language