Ad will apear here
Next
शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा
कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करीत कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे साध्य होते ते शेअर बाजारामुळे. शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार कुणीही अगदी घरातून, घराबाहेरून, ऑफिसमधून, प्रवासातून, मोबाइलच्या साह्याने करू शकतो, असे स्पष्ट करीत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी ‘शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा’मधून विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

शेअर बाजार म्हणजे नक्की काय याची प्रथम ओळख करून देत गुंतवणुकीचे महत्त्व, ती का करावी, शेअर मार्केट गुंतवणूक किती करावी, त्याचे फायदे, शेअर, डिव्हिडंड, बोनस शेअर, गुंतवणुकीचे प्रकार, भारतीय शेअर बाजार याची माहिती दिली आहे. शेअर व्यवहारासाठी आवश्यक डिमॅट अकाउंट, शेअरबाजार, सेन्सेक्स आणि निफ्टी, डेरिव्हेटिव्हज मार्केट (वायदे बाजार) म्हणजे काय, झटपट पैसे कमावून देणारे शेअर कसे ओळखावे, शेअरचे तांत्रिक विश्लेषण अशी सर्व माहिती यात सोप्या भाषेत दिली आहे.

पुस्तक : शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा
लेखक : रवींद्र पाटील, सुभाष पांडे
प्रकाशक : दिशोत्तमा प्रकाशन
पाने : ११२
किंमत : ११० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZULBZ
Similar Posts
भारतीय इनकमटॅक्स अॅक्ट इनकमटॅक्स अर्थात प्राप्तिकर हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. तो अखेरीस असला, तरी त्याची तयारी संपूर्ण वर्षभर करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने भारतीय इनकमटॅक्सची माहिती देणारे हे पुस्तक सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी लिहिले आहे.
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
ध्येयपथ प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही सुप्त इच्छा असतात. प्रत्येकाची काही स्वप्न असतात. जेव्हा या सुप्त इच्छा, स्वप्न स्पष्टपणे त्या व्यक्तीला समजतात, तेव्हा ते त्या व्यक्तीचे ध्येय होते. प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते. ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, श्रम करण्याची तयारी, ध्येयापर्यंत पोहोचण्याची वेळ यात फरक
खान्देशी....बावनकशी..! जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा खानदेश समजला जातो. सांस्कृतिकदृष्ट्या हा भाग समृद्ध समजला जातो. या प्रदेशातील बोली अहिराणीला प्राचीन परंपरा आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांनी अहिराणी भाषेला सन्मान मिळवून दिला. या बोलीभाषेच्या समृद्धीत भर घातली ती लतिका चौधरी यांच्या साहित्याने. धुळे आकाशवाणी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language