
दोन व्यक्ती समोरासमोर आल्या की काय कसे काय, बरे आहे ना, अशी विचारपूस केली जाते. बरे आहे का? याचा अर्थ अनेकदा आरोग्याशी संबंधित असतो. निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी सदिच्छाही दिल्या जातात. आपली प्रकृती जाणून घेऊन त्याप्रमाणे आहारविहार ठेवणे, उपचारपद्धती आदींची माहिती डॉ. पा. ह. कुलकर्णी यांनी ‘कशी आहे प्रकृती’मधून दिली आहे.
आयुर्वेदाची प्रश्नोत्तरातून ओळख करून देत आपापली प्रकृती कशी जाणावी याचे कोष्टक दिले आहे. प्रकृतीचा तोल सांभाळण्यासाठी दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा, कोणते अन्न खावे, कोणते टाळावे, मृत्यूची जाणीव, मरणानंतरचा प्रवास, जगण्याचा अनुभव, ज्ञानेश्वरीतील अध्याय दोन, नऊ व १३ मधील विचार, आसने व दोष विचार, निरोगी राहण्यासाठीचे उपाय यात दिले आहेत. ‘प्रकृती आणि रोग’ या प्रकरणात परदेशी व देशातील रुग्णांचे अनुभव आहेत. आपली प्रकृती जाणून विकृती कशी टाळावी, याचे मार्गदर्शन यातून मिळते.
प्रकाशन : दीर्घायु इंटरनॅशनल
पृष्ठे : ११६
मूल्य : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)