Ad will apear here
Next
श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र
गुरुचरित्रातील श्रीदत्त, श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंह या पुढील अवतार अक्कलकोटस्थित श्री स्वामी समर्थ यांचा मानला जातो. स्वामींचे पद्यातील चरित्र गद्यात आणण्याचे काम १९०४मध्ये प्रथम झाले. कै. रा. रा. सदाशिव वामन मराठे कृत स्वामी महाराजांचे पहिल्या गद्य चरित्राचे संकलन ‘श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र’ यातून विवेक दिगंबर वैद्य यांनी केले आहे.

मूळ ग्रंथातील लेखन यात जसेच्या तसे घेत अनेक प्रसंगांचे योग्य संदर्भ तसेच छायाचित्रांची यात भर घातली आहे. १८४६-४७मध्ये चिंतोपंतअप्पा टोळ हे सोलापूरला मामलेदार असताना त्यांची व महाराजांची पंढरपूरला गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटला आले, या हकीकतीने चरित्राला प्रारंभ झाला आहे.     

महाराजांचे वर्णन, त्यांचा राग, दर्शनाची पद्धत, त्यांची अचाट कृत्ये व चमत्कार, विविध ठिकाणच्या वास्तव्याच्या वेळच्या घटना, स्वामींचे भक्त, सेवेकरी, राजे-रजवाड्यांनी महाराजांची केलेली सेवा, प्रसंगी महाराजांनी एखाद्याचे केलेले गर्वहरण, सन्मार्गाचा संदेश आदी कथा यात वाचायला मिळतात. स्वामींच्या अवताराच्या कार्यसमाप्तीच्या वर्णनाने या चरित्राची सांगता होते.       

पुस्तक : श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र 
लेखक : विवेक दिगंबर 
प्रकाशक : पुनर्वसू प्रकाशन
पाने : २४४ 
किंमत : २५० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZZOCA
Similar Posts
श्रीअक्कलकोटस्थ स्वामी चरित्र + संक्षिप्त श्रीशंकर गाथा ‘यह दुनिया में कई रंग अशा है, यह रंग निराला है’ अशा सर्वांपेक्षा निराळ्या श्रीशंकर महाराजांचे हे चरित्र विवेक दिगंबर वैद्य यांनी लिहिले आहे. महाराजांना एक न सुटलेले कोडे समजले जाते. या आजानुबाहु सिद्धपुरुषाला कळीकाळाची तमा नसे.
श्री स्वामी समर्थांचे गुरुमंदिर ‘बाळप्पा मठ ते गुरुमंदिर हा केवळ एक वास्तू किंवा एका परंपरेचा प्रवास नाही, तर अतर्क्य अवधूत श्री स्वामी महाराजांच्या ‘कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम’ सामर्थ्याचा सर्वसामन्यांस ‘अनाकलनीय’ असा अद्भुत प्रवास आहे’, असे विवेक दिगंबर वैद्य यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे.
स्वर प्रभाकर गोवा ही कलेची भूमी आहे. या गोयंच्या मातीतून अनेक कलाकार घडले आहे. परिपूर्ण मैफलीचा आनंद त्यांच्या गाण्यातून मिळतो. कोणतेही सत्र असले, तरी मैफल रंगविण्यात त्यांची हातोटी आहे, अशी गुणवैशिष्ट्ये सांगत मंगला खाडिलकर यांनी पं. प्रभाकर कारेकर यांचा सुरेल जीवनप्रवास ‘स्वर प्रभाकर’मधून कथन केला आहे.
सिनेमाचे दिवस स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या आणि सिनेमा, नाटक वर्ज्य असलेल्या घरात जन्मलेला, वाढलेला मुलगा मोठा झाल्यावर चित्रपट निर्माता म्हणून लौकिक प्राप्त करतो, तेही वयाच्या चाळीशीनंतर. या चित्रपट निर्मात्याच्या, अरुण गोडबोले यांच्या धाडसाची ही कहाणी आहे. कशासाठी, प्रेमासाठी, नशीबवान, बंडलबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language