Ad will apear here
Next
महापुराण उपदेश
हिंदू धर्मात १८ मोठ्या पुराणापैकी एक आहे गरुड पुराण. विष्णू हा याच्या केंद्रस्थानी आहे. यात १९ हजार श्लोक आहेत, असे परंपरेने मानले जाते; पण आज जी हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यात आठ हजार श्लोक आहेत. या पुराणाची, तसेच मरण, भगवद्गीता आणि पुराणांतील लिखाण याबद्दल प्रा. डॉ. पांडुरंग हरी कुलकर्णी यांनी ‘महापुराण उपदेश’मधून सोप्या भाषेत माहिती दिली आहे.

गरुड पुराणात उल्लेख आलेले विविध विषय, या पुराणाची रचना, त्यातील विविध अध्यायांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. गीतेचा पंधरावा अध्याय, कठोपनिषदातील श्लोकांचा मराठीत अर्थ, मरणाविषयीचे विचार, काही अनुभव, मृत्यू येतानाची लक्षणेही सांगितली आहेत. पुराणे म्हणजे काय, महापुराणांची यादी, पुराणांमधून आयुर्वेदाबद्दलची माहिती, मृत्यू मुहूर्त, वर्षश्राद्ध व शेवयांची आदी छोटे लेखही यात आहेत.

पुस्तक : महापुराण उपदेश
लेखक : पांडुरंग कुलकर्णी
प्रकाशक : दीर्घायू इंटरनॅशनल
पाने : १२०  
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZLZBV
Similar Posts
देवमाळ देव आहे की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवमाळ’मधून ब्रह्मसूत्रे-वेदांतसूत्रे याचे विश्लेषण करताना देव या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे.
ज्ञानेश्वरी वाचताना श्रीकृष्णाने सांगितलेली गीता ही संस्कृतमधून होती. ती सामान्यांना कळावी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ती मराठीत आणली; पण गीतेचे फक्त भाषांतर नाही, तर कृष्णाला अर्जुनामार्फत सर्वांना काय सांगायचे आहे ते ‘ज्ञानेश्वरी’तून त्यांनी ओवी स्वरूपात सांगितले आहे. या ओव्या रचताना अनेक उदाहरणे, दृष्टांत, उपमा, अलंकार यांचा वापर केला आहे
होण्या बरे- गोळ्या चूर्णे निरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकविणे आपल्या हातात असते. यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे; पण तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते. कधी गंभीर आजार जडावतात. त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच. यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म, ती बनविण्याची पद्धत, औषधे वापरण्याचे प्रमाण याची माहिती प्रा
प्रश्नोत्तर रत्न मालिका (सचित्र) अद्वैताचा सिद्धांत मांडणाऱ्या आदि शंकराचार्य यांनी भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माची पुन:स्थापना केली. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे व काव्ये रचली आहेत. आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात प्रश्नोत्तर रत्नमालिकेची पद्य स्वरूपात रचना केली. प्रश्न आणि त्याची उत्तरे असे यातील श्लोक आहेत. याचे मराठी रूपांतर पां

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language