Ad will apear here
Next
पर्यावरण विवेक समितीचा वृक्षारोपण कार्यक्रम
प्रातिनिधिक फोटोपालघर : विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर संचलित पर्यावरण विवेक समितीच्या वतीने भालीवली प्रकल्पालगत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी केलेल्या यशस्वी उपक्रमानंतर पुन्हा या वर्षीही महाराष्ट्र सरकारच्या चार कोटी वृक्षलागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

यासाठी ‘एफडीसीएम’कडून वृक्षारोपणाकरिता परवानगी व जागेची निश्चिती करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने या वर्षीही ५०० भारतीय झाडांची लागवड व संवर्धन करण्याचा मानस आहे. त्यातील ५०० झाडे संस्थेच्या बाजूला (महामार्ग क्रमांक आठवर खानिवडे टोल नाक्यापासून एक किलोमीटर अगोदर, विरार फाट्यापासून चार  किलोमीटर मनोरच्या दिशेने पुढे) वन विभागाच्या जमिनीवर लावण्यात येतील व १०० झाडे ‘विवेक’ संचलित राष्ट्र सेवा समितीच्या शाळेतील विद्यार्थांच्या घरी व ५० झाडे विवेक राष्ट्र सेवा समितीच्या हँडीक्राफ्टचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या घरी लावण्यासाठी देण्यात येणार आहेत. 

समितीतर्फे वृक्षसंवर्धन दत्तक योजना राबवली जाते. इच्छुक वृक्षप्रेमी झाडे दत्तक घेऊन या योजनेत सहभागी होऊ शकतात, असे कार्यवाह उमेश गुप्ता यांनी सांगितले आहे. 
या अंतर्गत वृक्ष दत्तक घेणाऱ्या पालकाचे नाव तीन वर्षांकरिता झाडावरच टॅग केले जाते आणि समितीच्या वेबसाइटवरही अपलोड केले जाते.

कार्यक्रमाविषयी...
दिवस : शनिवार, एक जुलै २०१७ 
स्थळ : राष्ट्र सेवा समिती, ग्रामविकास केंद्र, भालीवली नाक्याच्या पुढे, एनएच आठ, पालघर.

अधिक माहितीकरिता संपर्क  :
कार्यवाह उमेश गुप्ता : ९३२२६ ९२७४३, ९४२२४ ९२७४३ 
मार्गदर्शक : एन. ए. पाटील (निवृत्त वनाधिकारी एसीएफ) : ९९६०३ ९७६०२ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYSVBD
Similar Posts
वृक्ष संवर्धनासाठी वृक्षदत्तक योजना भालीवली (पालघर): महाराष्ट्र शासनाच्या दोन कोटी वृक्षलागवडीच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ‘विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर’ संचालित ‘पर्यावरण विवेक समिती’द्वारे भालीवली येथे एफडीसीएमकडून एक हजार वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प केला गेला.  त्यातील ५०० झाडे परवानगी घेऊन संस्थेच्या परिसरात (महामार्ग क्र
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली
कुपोषण निर्मूलनासाठी पदभरती पालघर : कुपोषण निर्मूलनासाठी व बालमृत्यू रोखण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेमार्फत वैद्यकीय अधिकारी आणि सहायक परिचारिका प्रसाविका (ANM) या पदांसाठी आरोग्य विभागामार्फत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे   यांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात पावसाळ्या
स्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता. या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language