Ad will apear here
Next
श्री मनाचे श्लोक एक मागोवा
‘आधी प्रपंच करा नेटका’ असे रामदास यांनी सांगितले आहे. समर्थ रामदास म्हणजे केवळ पारमार्थिक संत नव्हेत, तर समाज शिक्षक, कवी, उपदेशक, रामोपासक, कुशल संघटक आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ संत, असे त्यांचे व्यामिश्र व्यक्तिमत्त्व होते. माणसाचे आयुष्य सफल व्हावयाचे असेल, तर त्याचे मन ताब्यात हवे, म्हणूनच समर्थांनी मनाला उपदेश करणारे श्लोक लिहिले. यातील शिकवणुकीचे महत्त्व आजच्या काळात प्रकर्षाने जाणवते. श्लोकांचा अर्थ, संदर्भ अरुण गोडबोले यांनी ‘श्री मनाचे श्लोक एक मागोवा’ यातून सांगितले आहेत.

सकल कला व विद्येचा दाता श्रीगणेश श्रीगणेश व देवता शारदेला वंदन करून ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ, आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा’ या श्लोकाने समर्थांनी सुरुवात करून २०५ श्लोकांतून सोप्या भाषेत तत्त्वज्ञानाशी ओळख करवून दिली आहे. या सर्व श्लोकांचा अन्वयार्थ विविध उदाहरणे देत लेखकाने समजून सांगितला आहे.     

पुस्तक : श्री मनाचे श्लोक एक मागोवा
लेखक : अरुण गोडबोले
प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २८०
किंमत : २२५ रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZPGCA
Similar Posts
करुणाष्टके - एक आकलन समर्थ रामदासांनी रचलेल्या करुणाष्टकांवर अरुण गोडबोले यांनी केलेले भाष्य म्हणजे हे पुस्तक आहे. अनेकदा ही करुणाष्टके आपल्या आजूबाजूला कानावर पडतात मात्र त्यावरील भाष्य ती समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. समर्थरचित ३२ करुणाष्टाकांपैकी २२ करुणाष्टकांवरील भाष्य या पुस्तकात आहे. ‘रामरूप’, ‘उदासीन हा काळ कोठे
सिनेमाचे दिवस चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊनसुद्धा त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहीत नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळिसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली
सिनेमाचे दिवस चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊन सुद्धा तो लागल्यावर त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहित नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळीसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली
अजरामर गीत रामायण भारतीयांच्या मनात रामायणाबद्दल नितांत श्रद्धा आहे. श्रीराम चरित्राने समाजजीवनावर अनेक संस्कार घडविले आहेत. हा संपूर्ण रामकथा गीतांमधून साकार करण्याची कल्पना आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे तत्कालीन सहनिर्देशक सीताकांत लाड यांना सुचली. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यावर गीते लिहिण्याची व सुधीर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language