Ad will apear here
Next
खरा संभाजी
आज (१४ मे) छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. त्या निमित्ताने, ‘खरा संभाजी’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
.......
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांचे जीवन अनेक घटनांनी भरलेले आहे. शंभू महाराजांना लहानपणापासून युद्धकलेचे धडे मिळालेच, शिवाय शत्रूला  कसे खेळवायचे, नामोहरम करायचे हेही ते शिकले. स्वराज्यासाठी त्यांनी प्राणार्पणही केले. स्वराज्याचा छावा असलेल्या संभाजी राजांचे चरित्र प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘खरा संभाजी’मधून कथन केले आहे.

प्रथम युवराज संभाजी यांचा परिचय करून देत औरंगजेब व संभाजी महाराज यांची तुलना, औरंगजेबापेक्षा लष्करी व आर्थिक ताकद कमी असतानाही दिलेला लढा, औरंगजेबाचा मुलगा अकबर व संभाजी यांचे संबंध, संभाजी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी करण्यात आलेली कारस्थाने व ती असफल ठरविण्यासाठी शंभूराजांनी दाखविलेली मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी याची प्रचिती यातून येते.

शिवाजी महाराजांच्या रणनीतीनुसार शंभूराजे दिलेर खानला जाऊन मिळाल्यानंतरचे प्रसंग, दिलेर खानाच्या तावडीतून सुटका केल्यानंतर पन्हाळगडावर राजांसोबतच्या चर्चा, राज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राज्याभिषेक व त्यानंतर स्वराज्य राखण्यासाठी, रयतेच्या सुखासाठी केलेल्या उपाययोजना, नावीन्यपूर्ण प्रकल्प यांची माहिती या पुस्तकात दिली आहे.

पुस्तक : खरा संभाजी
लेखक : प्रा. नामदेवराव जाधव
प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : २०६
किंमत : २२० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी, तसेच त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य या पुस्तकाविषयी वाचण्यासाठी आणि ते पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.) 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTLCM
Similar Posts
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा
गनिमी कावा शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांना अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्ध तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे
जिजाऊ- द मदर ऑफ ऑल गुरुज् मुलांचे संगोपन ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे; मात्र आदर्श माता बनायचे असेल, तर जिजाऊ आईसाहेबांना आदर्श ठेवायला हवा. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना बालपणापासून दिलेले संस्कार त्यांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि ते राखण्यासाठी उपयुक्त ठरले.
उद्योजक- शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे आचार-विचार, कर्तृत्व, कारकीर्द, साहस यांचा अभ्यास केला, तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रा. नामदेवराव जाधव यांनी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या उद्योजकतेचा परिचय करून दिला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language