Ad will apear here
Next
अवघाचि विठ्ठल
अवघ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या विठ्ठलाची महती संतांनी अभंग, पदे, भारुडे, गौळणी लिहून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. भक्तीचे तत्त्व उलगडतानाच काही संशोधक साहित्यिकांनी विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतला. त्यांना दिसलेले त्याचे रूप, विविध प्रकारे आलेली अनुभूती, विठ्ठलतत्त्वाचा शोध, वेध व मागोवा यांचा आढावा ‘अवघाचि विठ्ठल’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे. देविदास पोटे हे या पुस्तकाचे संपादक आहेत. यात रा. चिं. ढेरे यांनी शोधलेले विठ्ठलाचे मूळ, डॉ. हे. वि. इनामदार यांचा संत नामदेवांचा विठ्ठल, इतिहासाचार्य राजवाडे आणि वि. ल. भावे यांच्या नजरेतील विठ्ठल व अन्य संतांचे विठ्ठलनाम यांबद्दल डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिले आहे. डॉ. भा. पं. बहिरट, डॉ. कुमुद गोसावी, बाळ राणे, डॉ. लीला गोविलकर, डॉ. यशवंत साधू, साधना कळवणकर, वा. ना. उत्पात, डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली अशा विविध नामवंत लेखकांचे सुमारे ५० लेख यात असून, प्रत्येकाच्या दृष्टीतून दिसणारे विठ्ठलाचे रूप व महती यातून व्यक्त होते.

पुस्तक : अवघाचि विठ्ठल
संपादक : देविदास पोटे
प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन
पृष्ठे : ३८८
मूल्य : ५०० रुपये

(‘अवघाचि विठ्ठल’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZYUCC
Similar Posts
पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे.
हुतात्मा गोविंदराव डावरे काळाच्या पडद्याआड गेलेले हुतात्मा क्रांतिवीर गोविंदराव डावरे यांचे कार्य विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणले आहे. हुतात्मा डावरे यांचे चरित्र सांगताना पुस्तकात प्रारंभी १७२५ ते १८६५ पर्यंतच्या घटनांचे वर्णन केले आहे. त्यानंतरचा भाग गोविंदरावांच्या जन्मापासून सुरू होतो
भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे केवळ आशियात नव्हे, तर एकूणच आंतरराष्ट्रीय समुदायात भारताचा एक अग्रणी राष्ट्र म्हणून ठसा उमटविण्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. चीन, रशिया या शेजारी देशांशी संबंध दृढ करीत असतानाच जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इस्राइल, अरब देश आदी देशांमध्ये पंतप्रधानांनी दौरे
श्रीकृष्ण चरित्र कृष्ण हे नाव समोर आले की, त्याची विविध रूपे आठवतात. बाळकृष्ण, कान्हा, मुरलीधर, वासुदेव, योगेश्वर अशा अनेक नावांमधील त्याचे रूपही वेगळे असते. काही कथांमधून श्रीकृष्णाचे जे रूप रंगविले आहे, त्यापेक्षा तो वेगळा कसा आहे, याचा अभ्यास बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केला. कथांमधील कृष्ण त्यांनी ‘श्रीकृष्ण चरित्र’ वाचकांसमोर सादर केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language