Ad will apear here
Next
मी आणि नथुराम - शरद पोंक्षे यांचे नवे पुस्तक
गेल्या २० वर्षांपासून सातत्याने आपले विचार निर्भीडपणे मांडणाऱ्या शरद पोंक्षे या एका मनस्वी कलावंताने आपले अनुभव ‘मी आणि नथुराम!’ या पुस्तकाद्वारे मांडले आहेत. त्यांचे हे पुस्तक शब्दामृत प्रकाशनतर्फे २० एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित होत आहे. बुकगंगा डॉट कॉमवर या पुस्तकाची पूर्वनोंदणी केल्यास ४५० रुपयांचे हे पुस्तक ३५० रुपयांत मिळणार आहे. (पुस्तक नोंदणीची लिंक शेवटी दिली आहे.)

इतिहासातल्या एका महत्त्वाच्या घटनेची ‘दुसरी बाजू’ मांडणारी एक दर्जेदार नाट्यकृती म्हणजेच ‘मी नथुराम गोडसे बोलतोय!’ या नाटकाच्या माध्यमातून ‘नथुराम’ रंगमंचावर आला आणि गदारोळ सुरू झाला! नथुरामच्या भूमिकेत होते अभिनेते शरद पोंक्षे! स्वतःला बापूंचे पक्के अनुयायी म्हणवणाऱ्यांनी हाणामारी, तोडफोड, जाळपोळ करून अक्षरशः धुमाकूळ घातला. 

या सगळ्यात खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले शरद पोंक्षे! ते लढले, त्यांना बरेच काही सोसावे लागले. त्यांना हा संघर्ष कधी न्यायालयासोबत, कधी राजकीय पक्षांसोबत, तर कधी जवळच्या लोकांसोबतही करावा लागला.

या पुस्तकाबद्दल शरद पोंक्षे म्हणाले, ‘हे माझे पहिले पुस्तक! एखाद्या अभिनेत्याला एखादी भूमिका अशी मिळते, की ती त्याचे अख्खे आयुष्य ढवळून काढते. ती फक्त रंगमंचावर सादर करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर पडदा उघडण्यापूर्वी आणि पडदा पडल्यानंतरही त्याला त्या भूमिकेमुळे बराच संघर्ष करावा लागतो. अतोनात प्रेम मिळतंच; पण त्याचबरोबर खूप अवहेलनेला, जिवावर बेतणाऱ्या प्रसंगांनाही तोंड द्यावे लागते. मलाही नथुराम गोडसे ही भूमिका मिळाली ती अशीच! २० वर्षे, ११०० प्रयोग एवढा हा संघर्ष तुमच्यासोबत वाटून घ्यावा म्हणून हे पुस्तक लिहिले आहे.’ 

‘ज्या मायबाप रसिकांनी ही भूमिका अजरामर केली, त्यांच्यासाठी व नवीन येणाऱ्या कलावंतांसाठी ह्या वर्षांची ही माझी भेट आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पुस्तकाची नोंदणी करण्यासाठी कृपया https://www.bookganga.com/R/8B908 या लिंकवर क्लिक करावे किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क (बुकगंगा) : 8888300300
संपर्क (शब्दामृत) : 9970077255



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XUSCCV
Similar Posts
‘मिळून साऱ्याजणी’च्या वेगळ्या मुखपृष्ठांची कहाणी... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका विद्या बाळ यांचं ३० जानेवारी २०२० रोजी निधन झालं. स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. ‘मिळून साऱ्याजणी’ हे त्यांनी चालविलेलं मासिक हा त्याच कार्याचा एक भाग होता. या
लीळा पुस्तकांच्या पुस्तक या एका गोष्टीचे किती तरी पैलू आहेत आणि त्या प्रत्येक पैलूविषयी लोकं किती आस्था बाळगून आहेत, त्यासाठी किती कष्ट घेऊन लेखन करत आहेत, याची जाण ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक आपल्याला करून देते. विविध पुस्तके आणि लेखकांचा परिचय करून देणारे पुस्तक असूनही ते कंटाळवाणे होत नाही. नुकताच वाचन प्रेरणा दिन होऊन गेला
रिकाम्या वेळात मोबाइलवर खूप वाचायचंय? ‘बुकगंगा’ची ई-बुक्स, ऑडिओ बुक्स आहेत ना! संचारबंदीच्या काळात घरी बसून काय करायचं, असा प्रश्न पडल्यानंतर प्रत्येकाने त्यावर आपापलं उत्तर शोधलंय. जो तो आपल्या आवडीचं आणि आपल्याला सुचेल ते वेगळं काम करतोय. कोणी गाणी म्हणतंय, वाद्य वाजवतंय, तर कोणी आपली कला फेसबुक लाइव्हवरून दाखवतंय. कोणी घरात असलेली पुस्तकंही वाचतंय... पण तुम्हाला त्यापेक्षा वेगळी
महर्षी अरविंद यांचे अजरामर महाकाव्य - सावित्री महर्षी अरविंद (१५ ऑगस्ट १८७२ ते पाच डिसेंबर १९५०) यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे ‘सावित्री’. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. अनेक वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language